Marriage Rule : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात लग्नसराईचा सीजन सुरू आहे. सर्वत्र लग्नाचा सिझन सुरू असल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जुळून आलेल्या रेशीमगाठी आता विवाह बंधनात अडकणार आहेत.
विशेष म्हणजे ज्या लोकांच्या रेशीमगाठी जुळून आल्यात त्यापैकी अनेकांचा लग्नाचा बार देखील उडाला आहे. यामुळे बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
लग्नसराईचा सीजन म्हणून भारतीय शेअर बाजार देखील गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहेत. लग्न म्हटलं म्हणजेच लाखो रुपयांचा खर्च. कपडे, सोने-नाणे, मंडप, बँड, लाँस, केटरिंग इत्यादीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो.
वाढत्या महागाईमुळे तर लग्न करण्याचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच आहे.लग्न जमवण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत लाखोंचा खर्च करावा लागत असल्याने सर्वसामान्यांना अनेकदा लग्नासाठी कर्ज देखील काढावे लागते.
मात्र बऱ्याच वेळा विनाकारण जमलेले लग्न मुडते. मुलाकडून किंवा मुलीकडून विनाकारण जमलेले लग्न मोडले जाते. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया जातो शिवाय समाजात बदनामी होते ती वेगळी.
ज्या लोकांनी कर्ज घेऊन लग्नासाठी खर्च केलेला असतो अशा लोकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून जर जमलेले लग्न मुलाने किंवा मुलीने विनाकारण मोडले असेल तर कायदेशीर कारवाई करता येते का ? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, याबाबत तज्ञ लोकांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणताय तज्ञ
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, जर जमलेले लग्न मुलाने किंवा मुलीने विनाकारण मोडले असेल तर लग्न विनाकारण मोडलेल्या पार्टी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणात समोरच्या पार्टी विरोधात नुकसान भरपाईची केस दाखल करता येते.
खरे तर जमलेले लग्न जर मुडले तर समाजात मोठी बदनामी होते शिवाय आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी विनाकारण लग्न मोडलेल्या पार्टी विरोधात न्यायालयात दावा दाखल करता येतो.
न्यायालयात दावा दाखल करून लग्न जमवण्यापासून झालेला सर्व खर्च जसे की पाहूनचारावरचा खर्च, चहा-पाणी, नाश्ता, बस्त्यासाठी आलेला खर्च, कपडे, सोने-नाणे किंवा इतर ठिकाणी केलेला सर्व खर्च वसूल करता येतो.