Married Women Property Rights : आपल्या देशात संपत्तीच्या कारणावरून नेहमीच वाद वाद पाहायला मिळतात. संपत्तीमुळे, मालमत्तेमुळे भावाभावांमध्ये भांडणे होतात. कुटुंबात संपत्तीमुळे फूट पडते. खरेतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याने संपत्ती विषयक अधिकार पुरवले आहेत.
दरम्यान विवाहित महिलेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीत किती अधिकार मिळतो ? विवाहित महिन्याला सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार मिळतो का असे अनेक प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केले जात होते.
अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लग्न करून घरात आलेल्या विवाहितेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीत किती अधिकार असतो याबाबत कायदा काय सांगतो याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
पतीच्या संपत्तीवर महिलेचा किती अधिकार?
भारतीय कायद्यानुसार, पती जिवंत असताना पतीने मिळवलेल्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो. मात्र पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा मालमत्तेवर अधिकार राहणार आहे. पण जर पतीने मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र केले असेल आणि त्यात मालमत्ता कोणाला मिळाली पाहिजे याविषयी लिहिलेले असेल तर त्यानुसार मालमत्तेचे अधिकार ठरवले जाणार आहेत.
असं असेल तर पतीच्या संपत्तीत अधिकार मिळणार नाही
भारतीय कायद्यानुसार, जर एखादी महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली असेल तर अशा स्त्रीला तिच्या पतीकडून केवळ भरणपोषणासाठी भरपाई मिळण्याचा अधिकार आहे, परंतु विभक्त झाल्यानंतर ती तिच्या पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क मागू शकत नाही.
सासरच्या संपत्तीत पत्नीला केव्हा अधिकार मिळू शकतो?
हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम ८ अन्वये स्त्रीला तिच्या सासरच्या घरात किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो. तथापि, पतीच्या मृत्यूनंतर, विधवेला तिच्या सासरच्या मालमत्तेत हक्क असतो.
वडिलोपार्जित संपत्तीत तिच्या मयत नवऱ्याला जेवढा हिस्सा मिळणार होता तेवढा हिस्सा मिळवण्यास सदर विधवा महिला पात्र ठरते.
सुप्रीम कोर्टाने 1978 मध्ये गुरुपाद खंडप्पा मगदम विरुद्ध हिराबाई खंडप्पा मगदम या प्रकरणात सामायिक मालमत्तेबाबत ऐतिहासिक निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयातील वकील गौरव भारद्वाज म्हणतात की, लग्नानंतर महिलेला समजते की तिचा पती आणि सासरच्या सर्व संपत्तीवर तिचा हक्क आहे.
तर कायदेशीर परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जोपर्यंत विवाहित स्त्रीला सासरच्या संपत्तीत भागीदार बनवले जात नाही तोपर्यंत तिच्या पतीच्या किंवा सासरच्या मालमत्तेवर तिला कोणताही अधिकार मिळतं नसतो.
केवळ लग्न करून, स्त्रीला सासरच्या संपत्तीवर किंवा पतीच्या मालमत्तेवर अधिकार मिळत नाही. मात्र तिच्या पतीच्या मृत्यूनंतर परिस्थिती बदलते, कारण की पतीच्या मृत्यूनंतर ती महिला तिचा पतीचा अधिकार प्राप्त करण्यास पात्र ठरते.