Member Of Parliament Salary : कोणत्याही कंपनीत किंवा शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने तसेच सदर कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे वेतन दिले जात असते. अशा परिस्थितीत तुम्ही कधी विचार केला आहे का आपण निवडून दिलेल्या मेंबर ऑफ पार्लमेंट अर्थातच खासदाराला किती पगार मिळत असेल ? तुम्हाला आपल्या देशात एका खासदाराला किती पगार मिळतो याबाबत माहिती आहे का? नाही चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात एका खासदाराला किती पगार मिळतो.
भारतात एका खासदाराला किती पगार मिळतो ?
येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून मतदार राजा आता आपल्या क्षेत्रातील खासदाराची निवड करणार आहेत. खासदार अर्थातच मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी लोकसभा निवडणूक आयोजित केली जाते.
ही निवडणूक दर पाच वर्षांनी होते. अर्थातच एकदा नियुक्त केलेले खासदार पाच वर्षांसाठी सदर मतदारसंघाचे कामकाज पाहतात. खासदार कायदेमंडळात अर्थातच संसदेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
दरम्यान येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक सुरू होणार असल्याने आतापासूनच राजकीय पक्षांनी निवडणुकीत यश संपादित व्हावे यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान आज आपण लोकसभेच्या निवडणुकीत जे नवीन खासदार नियुक्त होतील अर्थातच लोकसभेत जे खासदार निवडून जातील त्यांना किती वेतन मिळते याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संसद सदस्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन (सुधारणा) कायदा, 2010 नुसार भारतात एका खासदाराला 50,000 रुपये एवढा पगार मिळतो.
याशिवाय, संसद सदस्य म्हणजेच खासदार यांना अनेक प्रकारचे भत्ते आणि फायदे दिले जातात. त्यांना दरमहा ४५,००० रुपये मतदारसंघ भत्ताही दिला जातो.
खासदारांना सभागृहाच्या अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी आणि कोणत्याही सभागृहाच्या कामकाजासाठी प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटर 16 रुपये भत्ता दिला जातो. खासदारांना रेल्वेने मोफत प्रवास करण्यासाठी पासही दिले जातात.
या पासने MP महोदय यांना ट्रेनची फर्स्ट क्लास एसी सीट मिळू शकते. खासदारांना कामासाठी परदेशात जाताना सुद्धा भत्ता दिला जातो. याशिवाय त्यांना दरमहा ६० हजार रुपये कार्यालयीन खर्च भत्ता मिळतो.
विशेष गोष्ट अशी की खासदारांना दिल्या जाणाऱ्या पगारावर आणि भत्त्यावर कोणताच टॅक्स आकारला जात नाही. खासदार महोदय यांना वेगवेगळे बत्ते दिले जातात त्यांच्या परिवारातील सदस्यांना देखील वेगवेगळे लाभ सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.