Mhada Mumbai Lottery : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये आपले एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न हजारो, लाखो लोकांनी आपल्या उराशी बाळगले आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. घराच्या वाढलेल्या किमती अनेकांच्या या स्वप्नाच्या आड येतात. यामुळे अनेक जण म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान, म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळ या चालू महिन्यात अर्थात जुलै 2024 मध्ये तब्बल 1900 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
गेल्यावर्षी म्हणजे 2023 मध्ये मुंबई मंडळाने चार हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती. यंदाच्या वर्षी मुंबई मंडळाकडून जवळपास दोन हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. जुलै अखेरपर्यंत याची जाहिरात प्रसिद्ध होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या आगामी लॉटरीत मुंबई मंडळाकडून विविध भागातील घरांचा समावेश केला जाणार असून विविध उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
विशेष म्हणजे या 2024 च्या लॉटरीत गोरेगाव येथील प्रेम नगर या ठिकाणी विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पातील घरांचा देखील समावेश राहणार आहे. म्हाडाच्या माध्यमातून विकसित होणारा हा गृहप्रकल्प खूपच हाय-फाय आहे.
या गृह प्रकल्पात 39 मजली टॉवर राहणार असून सध्या याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 29 मजली टॉवरचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम या वर्षाखेरीस पूर्ण होणार आहे.
यामुळे या गृहप्रकल्पातील घरांचा देखील म्हाडाच्या आगामी सोडतीत समावेश करण्यात आला आहे. मात्र या हाय फाय प्रोजेक्टमधील घरांच्या किमती काय राहणार हा मोठा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. या घरांच्या किमती मंडळाने निश्चित केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. खरे तर या गृहप्रकल्पात 332 घरांचा समावेश आहे.
ही घरे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राहणार आहेत. यामध्ये 794 चौरस फुटाचे घर हे मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राहणार असून याची किंमत एक कोटी दहा लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.
तसेच, या प्रकल्पातील 979 चौरस फूटाचे घर उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राहणार असून याची किंमत एक कोटी 40 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे म्हाडाच्या या हाय-फाय घरांना नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.