Mhada Mumbai Lottery News : राज्यातील विविध शहरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर, अशा विविध शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.

म्हाडाच्या घर खरेदीला नेहमीचं सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद दाखवला जात असतो. म्हाडा दरवर्षी राज्यभरात घरांसाठी लॉटरी काढत असते. येत्या काही दिवसांनी मुंबईमधील हजारो घरांसाठी देखील म्हाडाकडून लॉटरी जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

या आगामी सोडतीत मुंबईमधील तब्बल 2,000 घरांचा समावेश राहणार अशी शक्यता आहे. गोरेगावमधील पहाडी परिसरात विकसित होणाऱ्या गृहप्रकल्पातील 332 घरांचा देखील यामध्ये समावेश राहणार आहे. या घरांसाठी या चालू महिन्यातच म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ज्या दिवशी जाहिरात निघेल त्याच दिवसापासून या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच या घरांसाठी सप्टेंबर मध्ये प्रत्यक्षात संगणकीय सोडत काढली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

Advertisement

म्हणजेच ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांआधीच मुंबईमधील या घरांसाठी लॉटरी निघणार आहे. दरम्यान, जर तुम्हीही मुंबई मंडळाच्या या आगामी सोडतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.

कारण की, आज आपण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज भासते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हालाही मुंबई मंडळाच्या या आगामी सोडतीसाठी अर्ज करायचा असेल तर आत्तापासूनच या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी लागणार आहे.  

Advertisement

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात 

अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पतीचे किंवा पत्नीचे आधार कार्ड 

Advertisement

मोबाईल क्रमांक ( मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे )

अर्जदाराचे पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पतीचे किंवा पत्नीचे पॅन कार्ड 

Advertisement

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र 

जातीचे प्रमाणपत्र

Advertisement

उत्पन्न दाखला 

अर्जदाराची ITR पावती, सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 द्यावा लागणार आहे. अर्जदार विवाहित असल्यास जोडीदाराची ITR पावती, सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 लागणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *