Mhada Mumbai Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षानंतर लॉटरी काढली आहे. Mhada ने 2019 मध्ये शेवटची घरांसाठीची सोडत काढली होती, तेव्हापासून सोडत निघालेली नव्हती. यामुळे मुंबई मंडळाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात केव्हा लॉटरी निघणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
अनेकजण मुंबई मंडळाच्या लॉटरीची गेल्या चार वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. कारण की, 2019 च्या लॉटरीमध्ये देखील खूपच कमी घरे होती. आता मुंबई मंडळाने 4 हजार 82 घरांसाठी लॉटरी काढली आहे. परंतु या सोडतीला नागरिकांनी सुरुवातीच्या टप्प्यात खूपच कमी प्रतिसाद दाखवला.
तज्ञांच्या मते, या लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती खूपच अधिक असल्याने नागरिकांनी कमी प्रतिसाद दाखवला आहे. या सोडतीसाठी मात्र कमी अर्ज दाखल झालेत यामुळे Mhada प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासं मुदतवाढ देण्यात आली आहे. आता दहा जुलै 2023 पर्यंत इच्छुक व्यक्तींना अर्ज सादर करता येणार आहे.
अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक जुलै 2023 पर्यंत 97 हजार 543 लोकांनी या लॉटरीसाठी अर्ज भरला आहे. विशेष बाब अशी की, यापैकी ७०४९७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज सादर केला आहे. एकूणच काय की मुदतवाढ दिली असल्याने अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
जवळपास एक लाख लोकांनी यासाठी अर्ज सादर केला आहे. आणखी आठ दिवसांचा कालावधी नागरिकांजवळ आहे. यामुळे ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 10 जुलैपर्यंत यासाठी अर्ज भरता येणार आहे तसेच ऑनलाईन अनामत रक्कम देखील दहा जुलै पर्यंतचे भरावी लागणार आहे.
जर 10 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरली नाही तर १२ जुलै पर्यंत अशा लोकांना बँकेत जाऊन आरटीजीएस किंवा एनईएफटीच्या माध्यमातून अनामत रकमेचा भरणा करावा लागणार आहे.
अंतिम यादी केव्हा निघणार?
मिळालेल्या माहितीनुसार 17 जुलै रोजी दुपारी तीन वाजता सादर झालेल्या अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाली की ऑनलाईन दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत.
यासाठी 19 जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर, मग 24 जुलै 2023 रोजी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.