Mhada News : नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच म्हाडाच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर मुंबई, पुणे, नासिक, नवी मुंबई, ठाणे यांसारख्या परिसरांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
येथे व्यावसायिक मालमत्तांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या लोकांना व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा आहे अशा लोकांसाठी आता गुंतवणूक करणे सोपे राहिलेले नाही.
मात्र मुंबईत व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी म्हाडाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. ते म्हणजे जानेवारीअखेर म्हाडाकडून एक मोठी जाहिरात काढली जाणार आहे.
यामुळे मुंबईमध्ये ज्या लोकांना व्यवसायिक मालमत्तेत नवीन वर्षात गुंतवणूक करायची असेल अशा लोकांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, म्हाडा मुंबई मंडळाकडून जानेवारी 2024 अखेरपर्यंत मुंबईतील तब्बल 170 दुकानांचा लिलाव केला जाणार आहे. खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून या लिलावाची वाट पाहिली जात होती.
आता मात्र या लिलावाला मुहूर्त लाभला आहे. म्हाडा 170 दुकानांच्या लिलावासाठी जानेवारीअखेर जाहिरात काढणार असा दावा केला जात आहे. हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने ई-ओक्शन करून पूर्ण केला जाणार आहे.
कोणत्या भागात किती दुकान राहणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली- 12, मागाठाणे- 12, चारकोप- 34, मालवणी- 57, बिबिंसारनगर, गोरेगाव- 17, तुंगा आणि पवई- 3, गव्हाणपाडा आणि मुलुंड- 8, स्वदेशी मिल- 5,, प्रतीक्षानगर आणि शीव- 15 अशी एकूण 170 दुकाने लिलावासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
यासाठी 13 कोटी ते 25 कोटी एवढी बोलीची रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. यासाठी जाहिरात निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अनामत रकमेसह अर्ज करता येणार आहे.
अर्ज सादर झाल्यानंतर योग्य अर्जदारांची निवड होईल आणि त्यानंतर ई ओक्शन केले जाणार आहे. या लिलावात जे पात्र अर्जदार सर्वाधिक बोली लावतील त्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करून दुकानाचा ताबा दिला जाणार आहे.