Mhada News : अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. मात्र अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती महागाई, वाढती लोकसंख्या, मजुरीचे वाढते दर, विस्तारत असणारे शहरीकरण आणि नागरिकीकरण या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती आधीच्या तुलनेत खूपच वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे भविष्यात देखील घरांच्या किमती अशाच वाढत राहतील असे दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य लोक घर खरेदीसाठी नेहमीच म्हाडाच्या घरांना प्राधान्य दाखवत असतात. म्हाडा दरवर्षी विविध शहरांमधील घरांसाठी लॉटरी काढत असते.
म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून दिले जातात. म्हाडा मुंबई मंडळ देखील येत्या काळात सर्वसामान्यांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील जवळपास दोन हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार असून यासाठीची जाहिरात जुलै अखेरपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.
मुंबई सोबतच आगामी काळात पुण्यातही म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मंडळाने नुकतीच एक सोडत जाहीर केली होती. या सोडती मधील घरांसाठी हजारो नागरिकांनी अर्ज केले होते.
पुण्यातील या घरांसाठी नागरिकांची मोठी पसंती मिळाली. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीत उपलब्ध असणाऱ्या घरांची संख्या ही एकूण इच्छुकांची संख्या पाहता खूपच कमी होती. यामुळे आता पुणे मंडळाकडून लवकरच आणखी एक लॉटरी जाहीर केली जाणार आहे.
अर्थातच यंदाची पुणे मंडळाची दुसरी सोडत येत्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष बाब अशी की राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनीच ही माहिती दिली आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 18 जुलैला पुणे मंडळाच्या 4850 घरांसाठीची संगणकीय सोडत निघाली.
या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले. आता या सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांना घराचा ताबा दिला जाणार आहे. दरम्यान गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ज्या नागरिकांना पुणे मंडळाच्या 2024 च्या पहिल्या सोडतील घर मिळाले नाही त्यांना आगामी सोडतीत घर खरेदीची संधी मिळणार असे म्हटले आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार आगामी काळात म्हाडा राज्यभरात 7500 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोकण मंडळातील घरांचा समावेश राहणार आहे. यामुळे नक्कीच या संबंधित मंडळाच्या कार्यक्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे मंडळ 2024 मधील दुसरी लॉटरी जाहीर करणार असल्याने आता इच्छुक नागरिकांना डिपॉझिटची रक्कम तयार ठेवावी लागणार आहे. जर तुम्हालाही पुण्यात म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर आत्तापासूनच अनामत रक्कम जमवून ठेवावी लागणार आहे.
तसेच म्हाडाच्या घरांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची देखील आत्तापासूनच जमवाजमव करावी लागणार आहे. अन्यथा लॉटरीची जाहिरात निघाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे आणि पैशांची जमवाजमाव करताना अडचण येऊ शकते.