Mhada News : मुंबई महानगर क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दशकांमध्ये राजधानी मुंबईमध्ये घरांच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे ज्या लोकांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही ते लोक मुंबई महानगर क्षेत्रात घर घेतात.
दरम्यान मुंबई महानगरक्षेत्रातही खाजगी विकासकांकडून विकसित करण्यात आलेल्या घरांच्या किमती या खूपच अधिक आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक घरांसाठी नेहमीच म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे मे 2023 मध्ये कोकण मंडळाने लॉटरी काढली होती. त्यावेळी मात्र अनेकांना घर सोडतीसाठी विविध कारणांनी अर्ज सादर करता आला नाही.
यामुळे त्यावेळी काढलेल्या सोडतीमधील बहुतांशी घरे विक्री विना पडून आहेत. अशा स्थितीत या घरांची विक्री करण्यासाठी पुन्हा एकदा कोकण मंडळांने सोडत जाहीर केली आहे. गेल्या सोडतीत विक्री अभावी पडून असलेल्या तसेच विविध गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत प्राप्त झालेल्या तब्बल 5,311 घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाने सोडत जाहीर केली आहे.
त्यासाठी शुक्रवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक नागरिकांना या सोडतीमधील घरांसाठी अर्ज सादर करता येणार नाही. या सोडतीत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील घरांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या भागात घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीमधील महत्त्वाच्या तारखा
अर्ज विक्री आणि स्वीकृतीची अंतिम दिनांक : या सोडतीसाठी इच्छुक नागरिकांना 16 ऑक्टोबर 2023 रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक : 18 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:59 पर्यंत इच्छुक लोकांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरता येणार आहे.
आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक : 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.
पात्र अर्जदारांची अंतिम यादी केव्हा जाहीर होणार : 3 नोव्हेंबर 2023 रोजी या सोडतीसाठी सादर झालेल्या अर्जदारांपैकी पात्र अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
संगणकीय सोडत केव्हा निघणार : 9 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता 5311 घरांसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
घरांच्या किमती किती राहणार?
या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेच्या 1010 घरांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजने अंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या 2278 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामधील पंतप्रधान आवास योजनेच्या 1010 घरांसाठीच्या किमती 12 लाखापासून ते पंधरा लाखांपर्यंत राहणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.