Mhada News : मुंबई, नवी मुंबई, पुणे, अमरावती, नासिक, छत्रपती संभाजी नगर यांसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. घरांच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना आता घर घेणे मोठे मुश्किल बनले आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हाडा आणि सिडकोच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान सप्टेंबर 2023 मध्ये कोकण मंडळाने पाच हजार 311 घरांसाठी जाहिरात काढली होती.
या सोडतीसाठी 15 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत या सोडतीत 30 हजार 687 इच्छुक अर्जदारांनी अर्ज केले असून यापैकी 24 हजार 303 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.
आता या अर्जदारांना प्रत्यक्षात लॉटरी केव्हा निघणार याचे वेध लागले आहे. अशातच म्हाडा कोकण मंडळाकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या सोडतीसाठी प्रारूप यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे.
शिवाय सोडतीसाठी सादर झालेल्या अर्जांपैकी पात्र अंतिम अर्जांची यादी 11 डिसेंबर रोजी अर्थातच येत्या दोन दिवसात म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध होणार आहे.
केव्हा निघणार सोडत ?
वास्तविक कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या विक्रीसाठी 13 डिसेंबर 2023 ला संगणकीय सोडत काढली जाणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ही लॉटरी पुढे लांबवण्यात आली आहे.
अशातच आता ही लॉटरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निघू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. तथापि याबाबत कोकण मंडळाकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण या सोडतीसाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना लवकरच एसएमएस करून सोडतीचा दिनांक कळवला जाणार आहे.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकण मंडळाच्या ज्या सोडतीची आतुरतेने वाट पाहिली जात होती ती सोडत या महिन्याच्या अखेरपर्यंत निघेल आणि नवीन वर्षात या सोडतीत विजयी ठरलेल्या अर्जदारांना घर मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.