Mhada News : मुंबई, कोकण, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर अशा भागात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक या भागात म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडा संपूर्ण राज्यभर सर्वसामान्य नागरिकांसाठी माफक दरात घरांची निर्मिती करत असते.

अशातच, आता म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये म्हाडाच्या घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये 1133 घरांसाठी आणि 361 भूखंडांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीमध्ये छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि परभणी येतील घरांचा आणि भूखंडांचा समावेश होता.

या लॉटरीची फेब्रुवारीमध्ये जाहिरात निघाली आणि जाहिरात निघाल्याच्या दिवसापासूनच यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी 26 मे 2024 पर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

पुढे ही सोडत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे रखडली. यामुळे या घरांसाठी प्रत्यक्षात लॉटरी कधी निघणार हा मोठा सवाल अर्जदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

दरम्यान काल अर्थातच 16 जुलै 2024 ला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या हजारो घरांसाठी आणि भूखंडांसाठी प्रत्यक्षात लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. विजेच्या अर्जदारांना आता लवकरात लवकर घरांचा ताबा मिळणार आहे.

Advertisement

दरम्यान, काल ही सोडत काढताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील नक्षत्रवाडी येथे म्हाडा हजारो घरे तयार करणार अशी घोषणा केली आहे. या भागात छत्रपती संभाजी नगर मंडळ 1056 खरे विकसित करणार अशी मोठी घोषणा सावे यांनी काल केली.

निश्चितच, ज्या लोकांना छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हाडाची घरे घायची असतील त्यांच्यासाठी ही घोषणा मोठी दिलासादायी ठरणार आहे. या घोषणेमुळे आगामी काळात नक्षत्र वाडी येथे म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. 

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *