Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीचे स्वप्न कुठे ना कुठे मागे पडू लागले आहे. सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यात या महागाईत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्य लोक घर खरेदीसाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
दरम्यान, म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे म्हाडा प्राधिकरणाकडून मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गलगत परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत.
राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत आहे.
आतापर्यंत सहाशे किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. नागपूर ते भरवीर पर्यंतचा सहाशे किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असून भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा पूर्णपणे बांधून रेडी झाला आहे.
दरम्यान हा बांधून तयार झालेला मार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी ओपन होणार आहे. शिवाय इगतपुरी ते आमने पर्यंतचा शेवटचा टप्पा देखील लवकरात लवकर बांधून पूर्ण होईल आणि हा संपूर्ण समृद्धी मार्ग सर्वसामान्यांकरिता सुरू होणार आहे.
पण हा समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने राज्य रस्ते विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये दिले आहेत. अशा परिस्थितीत आता म्हाडा प्राधिकरण राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या पैशांच्या मोबदल्यात भूखंड घेणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
यासंदर्भात म्हाडाकडून सुद्धा हालचाली तीव्र झाल्या आहेत. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे निर्देश म्हाडा प्राधिकरणाकडून आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना देण्यात आले आहेत.
यामुळे, भविष्यात आता समृद्धी महामार्ग नजीक म्हाडाची घरे तयार होणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांना आता म्हाडाची परवडणारी घरे समृद्धी महामार्ग लगत उपलब्ध होणार आहेत.
या ठिकाणी तयार होणार म्हाडाची घरे
समृद्धी महामार्ग सहा जिल्ह्यांतून गेला आहे. मात्र म्हाडा प्राधिकरण नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांतून गेलेल्या महामार्गालगत म्हाडाची घरे तयार करणार आहे.
यासाठी या संबंधित जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या लगत जागेचा शोध सुरू आहे. विशेष बाब म्हणजे म्हाडा फक्त येथे गरज तयार करणार नाही तर संबंधित जागेवर नियोजनबद्ध शहर वसवणार आहे.