Modi Cabinate News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. अर्थातच लोकशाहीचा महाकुंभ पुन्हा एकदा सजणार आहे. पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करण्यात व्यस्त आहेत.
कोणत्या जागेवरून कोणता उमेदवार निवडून येईल त्याची चाचणी सध्या सुरू असून उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर होत आहेत. बीजेपीने नुकत्याच तीन दिवसांपूर्वी उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी बीजेपी लवकरच जाहीर करणार आहे.
शिवाय देशातील इतरही पक्ष लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देखील निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या असून आता फक्त तारखा घोषित करणे बाकी असल्याचे म्हटले जात आहे.
अशातच मात्र वर्तमान मोदी सरकारने एक मोठा डाव टाकला आहे. मोदी सरकारने ऐन लोकसभेच्या तारखा जाहीर होतील आचारसंहिता लागू होईल यापूर्वीच आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आज केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी काही असे निर्णय घेतले आहेत याचा थेट परिणाम निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो.
हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची मुदत एक वर्षाने वाढवली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिलेली आहे.
पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाची कालमर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
म्हणजेच आता उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलेला 31 मार्च 2025 पर्यंत अवघ्या 603 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. खरे तर सध्या स्थितीला गॅस सिलेंडर हे 903 रुपयांना उपलब्ध आहे.
मात्र उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये एवढे अनुदान दिले जात आहे. म्हणजे अनुदानित सिलिंडर 603 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान आज ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्यास मोदी सरकारने मान्यता दिलेली आहे.
यानुसार, आता एका वर्षात 12 सिलिंडरच्या मर्यादेपर्यंत 10 कोटींहून अधिक महिलांना प्रति सिलिंडर 300 रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळतं राहणार आहे.