Monsoon News : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात भारतात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पावसाची नोंद झाली. याचा परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक प्रमुख धरणांनी आता तळ गाठला आहे. जायकवाडी मध्ये अवघे 27 ते 28 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.
राज्यातील इतरही धरणांची अशीच परिस्थिती आहे. प्रामुख्याने मराठवाडा विभागातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून निदान 2024 च्या मान्सून मध्ये तरी समाधानकारक असा पाऊस बरसणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच बाबत तज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.
यावर्षी मान्सून काळात पाऊसमान कसे राहणार याबाबत हवामान तज्ञांनी काय माहिती दिली आहे याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर गेल्यावर्षी एलनिनो सक्रिय असल्याने मान्सून काळात चांगला पाऊस झाला नव्हता.
शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी एल निनो सक्रिय राहतो त्यावेळी आपल्याकडे दुष्काळ पडत असतो. तसेच ज्यावेळी ला निना सक्रिय असतो तेव्हा आपल्याकडे चांगला समाधानकारक पाऊस होतो.
अशातच येत्या जून महिन्यापर्यंत एलनिनोचा प्रभाव कमी होईल, एल निनो कमकुवत होईल आणि जुलै-ऑगस्टपर्यंत ला निना साठी अनुकूल परिस्थिती तयार होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
जर हवामान तज्ञांचा हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी मान्सून काळात निश्चितच चांगला पाऊस बरसणार आहे. याबाबत बोलताना आयएमडीचे माजी अधिकारी डॉ. के.जे. रमेश यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी जून-जुलैमध्ये ला-निना निर्माण होण्यीच शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.
यामुळे जर तज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर यंदाचा मानसून भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे.