Moon Land Price : भारताच्या इस्रो अर्थातच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थेचे चंद्रयान मिशन नुकतेच सक्सेसफुल झाले आहे. हे मिशन यशस्वी ठरल्यानंतर सर्व भारतीयांची छाती 56 इंचाची झाली आहे. संपूर्ण जगाला भारतीयांनी मिळवलेल्या या यशानंतर सुखद धक्का बसला आहे.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने कठीण परिश्रमानंतर, 2019 च्या अपयशातून यशाचे धडे गिरवत मिशन चंद्रयान यशस्वी करून दाखवले आहे. विशेष बाब अशी की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. यामुळे सर्व जगाची नजर भारताकडे आणि इस्रोकडे लागली आहे.
या मिशनमधून चंद्राबाबत काय माहिती मिळते याकडे सर्वसामान्य लोकांचे देखील लक्ष लागून आहे. दरम्यान भारताच्या चंद्रयान मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर चंद्रावर जमीन खरेदीला वेग आला असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी आता चंद्रावर जमिन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये भारतीयांचा देखील समावेश आहे. अनेक भारतीय लोकांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पण चंद्रावरच्या जमिनी भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर विक्री होत आहेत असे नाही तर या आधीपासून तेथील जमिनीची विक्री सुरूच आहे.
दरम्यान आज आपण चंद्रावर जमीन खरेदी करायची असल्यास ही जमीन कोणाकडून खरेदी करावी लागते, तेथील जमिनीचा एका एकराचा भाव काय? याबाबत थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चंद्रावरील एक एकर जमिनीचा भाव?
एका प्रतिष्ठित मेडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार चंद्रावर एक एकर जमीन खरेदीसाठी 37.50 यूएस डॉलर खर्च करावे लागतात. जर भारतीय रुपयांमध्ये बोलायचे झाले तर चंद्रावरील एका एकर जमिनीची किंमत ही सुमारे 3,075 रुपये एवढी आहे. दरम्यान आता आपण चंद्रावर जमीन खरेदी करण्याची प्रोसेस काय, चंद्रावरील जमिनी कोण विकत याबाबत जाणून घेऊया.
कोण विकत चंद्रावरील जमिनी
जगातील दोन महत्त्वाच्या कंपन्या चंद्रावरील जमिनी विकतात. लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री या दोन कंपन्या चंद्रावरील जमिनी विकत आहेत.
जर आपणास चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करून आणि जमिनीसाठी आवश्यक असलेला शुल्क भरून चंद्रावर जमीन खरेदी करू शकता. विशेष म्हणजे चंद्रावर कोणीही जमीन खरेदी करू शकतो. भारतीय व्यक्ती देखील चंद्रावर जमिनी खरेदी करण्यासाठी पात्र आहेत.