MPSC Exam Timetable 2024 : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवक तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची आणि प्रामुख्याने एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी आयोगाने अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. खरे तर एमपीएससीच्या परीक्षांसाठी राज्यभरातून लाखो तरुण-तरुणी तयारी करत असतात.
दरम्यान, या लाखो तरुणांना आता नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र एका महिन्याचा काळ शिल्लक राहिला असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांचे वेध लागले होते. पुढील वर्षाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक केव्हा जाहीर होणार हा सवाल या उमेदवारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
अशातच या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीने पुढील वर्षी होणाऱ्या एमपीएससी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.
यामुळे लाखो तरुणांची आतुरता आता संपणार आहे. MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हे अंदाजीत वेळापत्रक जाहीर केले आहे.
कुठं पाहणार अंदाजित वेळापत्रक ?https://www.mpsc.gov.in/ या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर 2024 वर्षातील संपूर्ण परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पाहता येणार आहेत.
तथापि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्षात घेतली पाहिजे की हे अंदाजीत वेळापत्रक आहे. यामुळे या वेळापत्रकात देण्यात आलेल्या जाहिरातीच्या अथवा परीक्षेचा प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो.
आयोग या अंदाजित वेळापत्रकात केव्हाही बदल करू शकतो. पण असा काही बदल झाला तर तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून केव्हा परीक्षा होणार, याची जाहिरात केव्हा निघणार, त्याची पूर्व परीक्षा केव्हा होणार, मुख्य परीक्षा केव्हा होणार, संबंधित पदाची मुलाखत केव्हा होणार यांसारख्या सर्व गोष्टी या अंदाजीत वेळापत्रकात दिल्या गेल्या आहेत.
पण हे अंदाजित वेळापत्रक आहे यामध्ये काही कारणास्तव बदल होऊ शकतो याची नोंद उमेदवारांनी घेणे अपेक्षित आहे.