Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचं प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुद्धा घोषणा केली आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच राज्यातील पात्र महिलांना एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत.
हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या कालावधीत या योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
दरम्यान एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. सध्या राज्यातील विविध भागात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे हेतू महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खरे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे.
मात्र अनेक महिलांचे बँकेत खाते नाहीये. यामुळे अशा महिलांसाठी पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक अभिनव योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अवघ्या शंभर रुपयात महिलांना बँक अकाउंट ओपन करून दिले जाणार आहे.
यामुळे नक्कीच पुण्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असून या बँकेच्या अभिनव योजनेचे कौतुक केले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज चालते.
दरम्यान या दोन्ही नेत्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी त्यांना बँकेत नवीन अकाउंट ओपन करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केल्या होत्या.
यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिलांना फक्त शंभर रुपयात बँक अकाउंट ओपन करून देण्यास सुरुवात केली आहे. या बँकेत अकाउंट ओपन करणाऱ्या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा देखील लाभ मिळणार आहे.
या जिल्हा बँकेच्या एकूण 294 शाखा असून या शाखांमध्ये जाऊन महिलांना शंभर रुपयात बँक अकाउंट ओपन करता येणार आहे. दरम्यान बँकेच्या अभिनव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवघ्या शंभर रुपयात बँक खाते उघडून देणारी सुविधा देणारी पहिलीच सहकारी बँक ठरली आहे.
निश्चितच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे पुण्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना या बँकेच्या अभिनव योजनेतून फक्त शंभर रुपयात बँक अकाउंट ओपन करून मिळणार आहे.