Mumbai Airport News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबई विमानतळाबाबत. खरंतर मुंबईमध्ये हवाई मार्गे आताच विमानाने ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी विमानाने मुंबई शहरात ये-जा करतात.
दरम्यान मुंबई शहरात विमानाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई विमानतळ देखभालीच्या कामाकरीता एका दिवसासाठी बंद ठेवले जाणार आहे. वास्तविक मुंबई विमानतळ दरवर्षी मान्सूनच्या आधी आणि मान्सून संपल्यानंतर एका दिवसासाठी देखभालीच्या कामाकरिता बंद केले जाते.
विमानतळावरील रनवेचे देखभालीचे दरवर्षी केले जाते. यावर्षी देखील मानसून पश्चात विमानतळावरील रनवेच्या देखभालीचे काम केले जाणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 17 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील रेल्वेच्या देखभालीच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मुंबई विमानतळ बंद केले जाणार आहे.
अर्थातच 17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ सकाळी 11 पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांसाठी बंद राहणार आहे. या दिवशी मुंबईतून कोणतेच विमान उड्डाण घेणार नाही तसेच कोणतेच विमान मुंबई विमानतळावर देखील दाखल होणार नाही.
विशेष बाब म्हणजे विमानतळ प्रशासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वीच एअरलाइन्स कंपन्यांना याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यामुळे एअरलाइन्स कंपन्यांनी यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन केलेले असेल. मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळावर रनवेची आवश्यक ती देखभालीचे कामे केली जाणार आहेत.
याशिवाय विमानतळावरील अन्यही महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. मुंबई विमानतळ हे देशातील दुसरे सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ आहे. अशा स्थितीत विमानतळ बंद केल्याशिवाय देखभालीची कामे करणे अशक्य असल्याने 17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद राहणार आहे. यामुळे जर आपण 17 ऑक्टोबरला मुंबईमधून विमानाने प्रवास करण्याचे नियोजन आखत असाल तर तुम्हाला यामध्ये बदल करावा लागणार आहे.