Mumbai-Ayodhya Flight : येत्या दोन दिवसात अर्थातच 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे विकसित होत असलेले वर्ल्ड क्लास सोयी सुविधा युक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट लोकार्पित केले जाणार आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच सुरू होणार आहे. यामुळे नव्याने तयार होत असलेल्या भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
दरम्यान राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथून अयोध्यसाठी फ्लाईटची देखील घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता देशाच्या आर्थिक राजधानीतून अर्थातच मुंबईमधूनही अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्स कंपनी ही विमान सेवा सुरू करणार आहे. या विमानसेवेची सुरुवात 12 जानेवारी 2024 पासून होणार आहे. मुंबई ते अयोध्या थेट विमान सेवा सुरू होणार असल्याने याचा निश्चितच राजधानी मुंबईसह राज्यातील राम भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे रामललाचे दर्शन अगदी वायू वेगाने घेता येणार आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या रामभक्तांना अवघ्या सव्वा 2 तासात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येऊ शकते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी हवाई दलाचे विमान प्रथमच धावपट्टीवर उतरले.
हवाई दलाच्या विमानातून ट्रायल लँडिंग करण्यात आले जे की पूर्णपणे यशस्वी झाले आहे. अर्थातच हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
विमानतळाला लागून असलेल्या मैदानावर ते जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. भाजपने जाहीर सभेची तयारी सुरू केली आहे. राजधानी दिल्लीहून पहिले विमान 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.20 वाजता विमानतळावर पोहोचणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फक्त एक तास आणि वीस मिनिटात दिल्लीत ते अयोध्या हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, इंडिगोच्या माध्यमातून दिल्लीनंतर अयोध्या ते मुंबई अशी थेट विमानसेवा १५ जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. विशेष बाब अशी की इंडिगोने तिकीटांचे बुकिंग सुद्धा सुरू केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येहून दुपारी 3.15 वाजता मुंबईच्या दिशेने विमान उड्डाण भरणार आहे आणि सायंकाळी 5:40 वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तसेच मुंबईहुन दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी टेकऑफ घेणार आहे आणि ते विमान दुपारी पावणे दोन वाजता अयोध्येला पोहोचणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या विमानसेवेचे 15 जानेवारीचे भाडे 4,500.99 रुपये ठेवण्यात आले आहे. हा प्रवास फक्त दोन तास 25 मिनिटांत पूर्ण होईल. या विमानसेवेमुळे राजधानी मुंबईतील राम भक्तांना आता जलद गतीने प्रभू श्रीरामांच्या नगरीत जाता येणार आहे.