Mumbai Bullet Train Project : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केलेले आहेत. या प्रयत्नांमुळे भारतातील रेल्वेचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक जलद झाला आहे. आता देशात वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू झाल्या आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन असून या ट्रेनचा कमाल स्पीड 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. ही गाडी देशभरातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असून आगामी काळात या गाडीला आणखी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर चालवली जाणार आहे.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात 320 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम असणारी बुलेट देखील रुळावर धावणार आहे.
ही गाडी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. हा बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिला-वहिला प्रकल्प राहणार आहे. यामुळे बुलेट ट्रेन रुळावर केव्हा धावणार ? हा मोठा प्रश्न प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर या रूटच काम कधी पूर्ण होणार ? असा सवाल आयटीआर अर्जाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता.
या दाखल झालेल्या अर्जावर नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेडने मोठी माहिती दिली आहे. हा रूट 508 किलोमीटर लांबीचा असून याचे काम कधी पूर्ण होणार हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
याशिवाय या प्रकल्पाचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होऊ शकतो आणि त्यावर चाचणीला केव्हा सुरुवात होणार या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या ट्रॅकच्या कामासाठी ‘व्हायाडक्ट’चा एकूण 35 किलोमीटरचा भाग सोपवला आहे. पूर्ण कॉरिडॉरच्या नागरी कामांसाठी 100 टक्के टेंडर आणि गुजरातमधील ट्रॅकच्या कामांसाठी टेंडर देण्यात आली आहेत.
गुजरातमधील सुरत आणि बिलीमोरादरम्यान ट्रायल रन 2026 मध्ये सुरू होणार असे प्राधिकरणाने यावेळी म्हटले आहे. एकंदरीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 मध्ये सुरू होऊ शकतो.