Mumbai Coastal Road : मुंबईकरांना नुकतीच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची म्हणजे अटल सेतूची भेट मिळाली आहे. दरम्यान दक्षिण मुंबई मधील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम असलेला मुंबई कोस्टल रोड प्रकल्प देखील लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यानच्या 10.58 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. प्रकल्पाचे आत्तापर्यंत 84 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे.
पण प्रिन्सेस स्ट्रीट मरिन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडचा बराचसा भाग आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गत वरळी येथील थडानी जंक्शन ते मरीन लाईन्स यादरम्यान बोगदा तयार केला जात आहे.
हा संपूर्ण प्रकल्प मुंबई महानगरपालिका तयार करत आहे. या वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतच्या बोगद्यात एकूण 10 क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहे.
म्हणजेच इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये प्रत्येकी 300 मीटर अंतरावर हे क्रॉस पॅसेजेस बांधण्यात आले आहेत. इमर्जन्सी मध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना याचा वापर होणार. या पॅसेजेसची एकूण लांबी 11 ते 15 मीटर एवढी आहे.
यातील काही पॅसेजेस प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तर काही पॅसेजेस वाहनांना बाहेर काढण्यासाठी असतील. खरंतर कोस्टल रोड हा समुद्रालगत बांधला जाणारा पहिलाच प्रकल्प आहे.
या प्रकल्पअंतर्गत तयार होत असलेले हे बोगदे पहिल्या टप्प्यात सुरू होणार नाहीत. जेव्हा संपूर्ण प्रकल्प सुरु होईल तेव्हा हे बोगदे सुरु होणार आहेत. या बोगद्यात प्रत्येकी 100 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच बोगद्याबाहेरील रस्त्यावर 300 मीटर अंतरावर कॅमेरे आहेत.
इमर्जन्सी मध्ये संपर्क साधण्यासाठी बोगद्यात प्रत्येक 50 मीटर अंतरावर पब्लिक एड्रेस स्पीकर आहे. बोगद्यातून प्रवास करताना एखाद्या वाहनाला आग लागली तर तेवढी आग सहन करण्याची कॅपॅसिटी बोगदा व भिंतींमध्ये आहे.
हा बोगदा चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळा बोगदा बोरिंग मशीनने तयार करण्यात आला आहे. बोगदे गिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून तयार करण्यात आले आहेत. यातील एका बोगद्याची लांबी 3.45 किलोमीटर एवढी आहे.
संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचा विचार केला असता आत्तापर्यंत 84 टक्के एवढे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पातील थडानी जंक्शन वरळी ते मरीन लाईन्स दरम्यानची एक मार्गीका फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अंशता सुरू केली जाणार अशी माहिती समोर येत आहे. तसेच हा संपूर्ण प्रकल्प मे 2024 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.