Mumbai Goa Expressway : महाराष्ट्राच्या विकासाचा, महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, सध्या स्थितीला 701 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
नागपूर ते भरविर हा 600 km चा भाग सध्या स्थितीला सुरू असून उर्वरित भरवीर ते आमने पर्यंतचा शंभर किलोमीटरचा टप्पा येत्या काही महिन्यांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटरचा पूर्णपणे बांधून रेडी झाला असून येत्या काही दिवसात या देखील मार्गावर वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.
यामुळे निश्चितच या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी देखील हालचाली तेज झाल्या आहेत.
मात्र असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे त्याचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. यामुळे कोकणवासीयांच्या माध्यमातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोकणातील नागरिकांनी फक्त कोकणातील प्रकल्पांनाच का उशीर होतो असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे. अशातच मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा महामार्गाचे उद्घाटन केव्हा होऊ शकते याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकतेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हातखंबा-तारवेवाडी-निवळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.
यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. सामंत यांनी मुंबई गोवा-महामार्गाची एक लेन मे 2024 पर्यंत सुरू होऊ शकते अशी आशा व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर हा संपूर्ण महामार्ग डिसेंबर 2024 अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल अशी महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
त्यामुळे आता तरी नियोजित वेळेत, मंत्री महोदयांनी सांगितलेल्या वेळेत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.