Mumbai Goa Vande Bharat Express : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन सुरू केली. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. यापैकी 7 गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत.
राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला मिळणार आहेत. पुढील महिन्यात मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
अशातच आता मुंबई ते गोवा दरम्यान अर्थातच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव या मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
ती म्हणजे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात एका दिवसासाठी बदल होणार आहे. सोमवारी अर्थातच 5 फेब्रुवारी 2024 ला या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस उशिराने धावणार आहे.
येत्या सोमवारी आणि मंगळवारी अर्थातच पाच फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारीला कोकण रेल्वे मार्गावरील वेर्णा ते माजोर्डा या मार्गावर रेल्वेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगा ब्लॉक एकूण दोन तासासाठी राहणार आहे.
या मेगा ब्लॉकमुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही एक्सप्रेस ट्रेन रत्नागिरी ते करमाळा या स्थानकादरम्यान एक तास उशिराने धावणार अशी माहिती कोकण रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.
यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. खरे तर ही गाडी सुरू झाल्यानंतर या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. या 8 डब्ब्याच्या वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद झाला आहे.