Mumbai Hot Favorite Destination : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई जगातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे जगभरात लाखो पर्यटक दरवर्षी भेटी देत असतात.
खरे तर मुंबईला अप्रतिम सौंदर्याची भेट मिळालेली आहे. मुंबई शहरातच अशी शेकडो ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केली जाऊ शकतात.
याशिवाय जिवाची मुंबई करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांना मुंबई जवळील काही लोकप्रिय ठिकाणांना देखील भेट देता येऊ शकणार आहे. मुंबई जवळ देखील शेकडो ठिकाणे फिरण्यासारखे आहेत.
मात्र अशी काही ठिकाणी आहेत ज्याबाबत कोणालाच फारशी माहिती नाही. मुंबईला चारी बाजूंनी समुद्रांने वेढलेले आहेत. हे एक बेटावर वसलेले शहर आहे.
यासोबतच मुंबई जवळ असेही एक आयलँड आहे जे चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. विशेष म्हणजे या आयलँड बाबत कोणालाच फारशी माहिती नाही. यामुळे याला सीक्रेट आयलँड म्हणूनही ओळखतात.
हे मुंबई जवळील हिडन प्लेस पक्क्या मुंबईकरांना मात्र ठाऊक आहे. दरम्यान आज आपण या हिडन प्लेस बाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत आहे ते हिडन प्लेस ?
आम्ही ज्या सीक्रेट आयलँड बाबत बोलत आहोत ते आहे मढ आयलंड. जर तुम्हाला येथे जायचे असेल तर मालाड येथून तसेच वर्सोवा येथील समुद्रकिनाऱ्यावरून तुम्हाला बोटने जावे लागणार आहे.
या ठिकाणी असलेल्या जेट्टीवरून तुम्हाला सहजतेने बोट मिळणार आहे. याला सिक्रेट बीच म्हणूनहीं ओळखले जाते. या ठिकाणी फिरण्यासारखे खूप काही आहे.
जर तुम्ही कधी इथे गेलात तर तुम्हाला मढ चर्च, मढ किल्ला, किल्लेश्वर महादेव मंदिर, एरंगळ नावाच छोटस गाव पाहता येणार आहे.
या आयलँड जवळ असणारे अक्साबीच, मार्वे हे समुद्रकिनारे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेला मालाडची खाडी आहे.