Mumbai-Jalna Vande Bharat Express : मराठवाड्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे.
यामध्ये मुंबई ते जालना दरम्यानच्या गाडीचा देखील समावेश होता. ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे चालवली जात आहे.
या गाडीमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर सहित मराठवाड्यातील नागरिकांना आता जलद गतीने मुंबईला पोहोचता येणे शक्य होणार आहे.
शिवाय मराठवाड्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी जाणाऱ्या मुंबईमधील पर्यटकांना देखील आता जलद गतीने मराठवाड्यात पोहोचता येणार आहे.
रम्यान ही गाडी सुरू झाल्यानंतर या गाडीला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 2 जानेवारी 2023 रोजी मराठवाड्यातील जालन्याहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
या ट्रेनमधील सर्वच्या सर्व 530 सीट फुल होत्या. या ट्रेन मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक होती.
काल सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही गाडी जालना येथील रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. जालना नंतर ही गाडी छत्रपती संभाजीनगर येथे आली आणि तेथून पुढे मुंबईचा प्रवास या गाडीने केला.
पहिल्यांदाच ही गाडी या मार्गावर धावली असल्याने प्रवाशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
वंदे भारत एक्सप्रेस बुधवारी धावणार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, ही हायस्पीड ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे सहा दिवस रेल्वे रुळावर धावणार आहे.
म्हणजेच ही गाडी बुधवारी जालना आणि मुंबई येथून रवाना होणार नाही. दरम्यान मराठवाड्यातून धावणाऱ्या या गाडीला 4 जानेवारी पर्यंत वेटिंग लिस्ट लागली आहे. अर्थातच 4 जानेवारीपर्यंत ही गाडी हाउसफुल राहणार आहे.