Mumbai Local Train News : मुंबईकरांची सकाळची सुरुवात ही चहासोबत होते की नाही हे माहित नाही पण त्यांची सुरुवात लोकलने नक्कीच होते. बहुसंख्य मुंबईकर कामाला जाताना अन येताना लोकलने प्रवास करतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनीच आहे. ही जीवनवाहिनी मुंबईमधील लाखो लोकांचा प्रवास रोजाना सुनिश्चित करते.
यामुळे मुंबईकरांना जलद प्रवास करता येत आहे. जर तुम्हीही मुंबईकर असाल आणि रोजच लोकलने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबईमधील विशेषतः दादर मधून लोकल पकडणाऱ्या प्रत्येक प्रवासासाठी महत्त्वाची आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दादर वरून सुटणाऱ्या जवळपास 11 लोकलच्या फेऱ्या आता परळवरून सुटणार आहेत.
आता तुम्हाला हा निर्णय घेण्यामागे नेमके कारण काय? हा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. पण हे रुंदीकरण करण्यासाठी फलट क्रमांक दोन देखील बंद ठेवावा लागणार आहे.
हेच कारण आहे की दादर स्टेशन वरून सुटणाऱ्या 11 लोकलच्या फेऱ्या आता परळ वरून सोडल्या जाणार आहेत. अकरा धिम्या लोकल आता दादर ऐवजी थेट परळपर्यंत धावणार आहे. विशेष म्हणजे तेथूनच या लोकल सुटणार देखील आहेत. यामुळे आता या 11 धिम्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी दादरला नव्हे तर परळला जावे लागणार आहे.
दादरच्या फलाट क्रमांक दोनवर येणाऱ्या 11 धिम्या लोकल आता 15 सप्टेंबरपासून परळपर्यंत धावणार असून तेथूनच या लोकल डाऊन दिशेकडे रवाना होतील अशी माहिती रेल्वेच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे. एकंदरीत आत्तापर्यंत जे प्रवासी दादर स्टेशनवर जाऊन धीम्या लोकल पकडत होते त्या प्रवाशांना आता या लोकल पकडण्यासाठी थेट परळला जावे लागणार आहे. त्यामुळे आता या अकरा लोकलचे टाईमटेबल बदलणार आहे.
कसं असणार नवीन वेळापत्रक
8 वाजून 7 मिनिटांनी दादरला येणारी ठाणे-दादर ही गाडी आता 8:13 मिनिटांनी परळला पोहोचेल आणि तेथून आठ वाजून 17 मिनिटांनी ही गाडी कल्याण कडे रवाना होईल.
नऊ वाजून 37 मिनिटांनी दादरला पोहचणारी टिटवाळा-दादर ही गाडी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी परळ येथे पोहोचेल आणि तेथून नऊ वाजून 47 मिनिटांनी ही गाडी कल्याण कडे रवाना होईल.
12:55 मिनिटांनी पोहचणारी कल्याण-दादर ही गाडी बारा वाजून 58 मिनिटांनी परळ येथे पोहोचेल आणि तेथून 1 वाजून एक मिनिटांनी कल्याणकडे रवाना होईल.
05:51 मिनिटांनी दादरला पोहोचणारी ठाणे-दादर ही गाडी आता परळला 5 वाजून 54 मिनिटांनी पोहोचेल आणि तेथून पुढे डोंबिवलीकडे ही गाडी पाच वाजून 56 मिनिटांनी रवाना होईल.
6 वाजून 10 मिनिटांनी दादरला पोहोचणारी ठाणे-दादर ही गाडी आता 06:13 मिनिटांनी परला पोहोचेल आणि तेथून सव्वा सहा वाजता ती गाडी कल्याणकडे रवाना होईल.
6 वाजून 35 मिनिटांनी दादरला पोचणारी डोंबिवली-दादर ही गाडी 10 वाजून 38 मिनिटांनी परळला पोहोचेल आणि तेथून 6 वाजून 40 मिनिटांनी ही गाडी कल्याणकडे रवाना होईल.
सात वाजून तीन मिनिटांनी दादरला पोहोचणारी ठाणे-दादर ही गाडी आता सात वाजून सहा मिनिटांनी परळला पोहोचेल आणि तेथून मग सात वाजून आठ मिनिटांनी ही गाडी कल्याणकडे रवाना होईल अशी माहिती समोर आली आहे.
सात वाजून 39 मिनिटांनी दादरला पोहोचणारी डोंबिवली-दादर ही गाडी आता सात वाजून 42 मिनिटांनी परळला पोहोचेल आणि मग तेथून पुढे 7 वाजून 44 मिनिटांनी ही गाडी डोंबिवलीच्या दिशेने रवाना होईल.
07:49 मिनिटांनी दादरला पोहोचणारी ठाणे-दादर ही गाडी आता सात वाजून 52 मिनिटांनी परळला पोहोचेल आणि तेथून मग सात वाजून 54 मिनिटांनी ही गाडी ठाण्याच्या दिशेने रवाना होईल.
आठ वाजून वीस मिनिटांनी दादर स्टेशनवर पोहोचणारी कल्याण-दादर ही गाडी आता आठ वाजून 23 मिनिटांनी परळ ला पोहोचणार आहे आणि तेथून मग आठ वाजून 25 मिनिटांनी ही गाडी कल्याणकडे रवाना होणार आहे.
10 वाजून 20 मिनिटांनी दादरला पोहोचणारी ठाणे-दादर ही गाडी 10 वाजून 23 मिनिटांनी परळला पोहोचेल आणि 10 वाजून 25 मिनिटांनी ही गाडी ठाण्याकडे रवाना होईल.