Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोसंदर्भात. खरंतर एम एम आर डी ए कडून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अंधेरी पूर्व (गुंदवली) ते नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळच्या टर्मिनल दोन दरम्यान मेट्रो मार्ग 7 अ प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग मेट्रो मार्ग 7 चा विस्तारित मार्ग राहणार आहे. सध्या या विस्तारित मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा जवळपास तीन किलोमीटर लांबीचा मार्ग अडीच किलोमीटर पर्यंत भुयारी मार्ग आहे. दरम्यान या भुयारीकरणाचे काम एक सप्टेंबर 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. भुयारी मार्गासाठी बोगदा तयार केला जाणार आहे. टी 62 या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने बोगदा तयार केला जाणार आहे.
भुयारीकरणाचे काम अंधेरी येथे सुरू झाले आहे. या भुयारीकरणाचे प्राथमिक कामे येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असे देखील सांगितले जात आहे. दरम्यान या मेट्रो मार्ग 7 अ चे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याच टारगेट एमएमआरडीने ठेवले आहे. म्हणजे काम सुरू झाल्यानंतर मात्र सात महिन्यात हा मेट्रो मार्ग प्रवासासाठी खुला करण्याचे टार्गेट एम एम आर डी ए ने ठेवले आहे.
यामुळे आता एम एम आर डी ए ने ठरवलेल्या वेळेत हा मार्ग पूर्ण होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. हा मेट्रोमार्ग एकूण तीन किलोमीटर लांबीचा असून यापैकी अडीच किलोमीटर लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे. भूमिगत मार्गासाठी बोगद्याचे काम काल सुरू झाले आहे.
विमानतळाच्या टर्मिनल दोन पुढे हे काम सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गांवर विमानतळ, विमानतळ वसाहत (अंधेरी) व अंधेरी पूर्व (गुंदवली) ही तीन महत्त्वाची स्थानके राहणार आहेत. यामुळे अंधेरी पूर्व मधून मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास गतिमान होणार अस बोललं जात आहे.