Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत मेट्रो मार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.
मुंबईसह राज्यातील पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी मेट्रोची उभारणी केली जात आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ही अपडेट आहे मुंबईमधील मेट्रो मार्ग 5 संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग 5 च्या दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्ती करणे हेतू आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबतची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केली असून लवकरच या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएने अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा नेमका कसा राहणार, या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या रेल्वे स्थानकांचा समावेश असणार, याचा रूटमॅप कसा असणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्ग 5 असून यातील ठाणे ते भिवंडी हा पहिला टप्पा आहे. तसेच भिवंडी ते कल्याण हा मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा आहे. हा दुसरा टप्पा 11.9 किलोमीटर लांबीचा असून यात एकूण सहा मेट्रो स्थानक विकसित होणार आहेत.
यातील भिवंडी हे स्थानक अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत राहणार आहे. तसेच, टेमघर, राजनौली, गोवेगाव, कोणेगाव आणि लालचौकी ही पाच स्थानके जमिनीवर राहणार आहेत.
या प्रकल्पासाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या मेट्रो मार्ग 5 अंतर्गत कापूरबावडी ते धामणकर नाका या मेट्रो मार्गीकेचे उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 85 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मेट्रो मार्ग 5 मेट्रोला मार्ग 12 ची जोडणी उपलब्ध होईल अन यामुळे ठाणे ते तळोजा हा प्रवास जलद होणार आहे.
ठाणे ते तळोजा दरम्यान या दोन्ही मार्गांमुळे मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. परिणामी या परिसरातील प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त होत आहे.