Mumbai Metro News : राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. शहरांमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरातील गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेला मेट्रो मार्ग सुरू झाला आहे.
बेलापूर ते पेंढार या मार्गावर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. सिडकोच्या माध्यमातून तयार झालेला हा मार्ग नवी मुंबईमधील पहिलाच मेट्रोमार्ग आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गाला नवी मुंबई मधील नागरिकांनी भरभरून असे प्रेम दाखवले आहे.
यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोमार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर या मेट्रोमार्ग अंतर्गत बेलापूर ते पेंढार दरम्यान 11 मेट्रो स्थानके विकसित झाली आहेत.
या मार्गावर पेंधार हे शेवटचे स्थानक आहे. मात्र हे स्थानक तळोजा नोड मध्ये आहे. अशा परिस्थितीत या स्थानकाच्या पुढे असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि उद्योजकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे.
तळोजा एमआयडीसी ही राज्यातील एक मोठी एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील लाखो कर्मचारी कामाला येतात. आता नवी मुंबई मधील पहिला मेट्रो मार्ग सुरू झाला आहे. पण या मेट्रो मार्गाचा या लोकांना फायदा होत नाहीये.
या लोकांना मेट्रो सुरु झालेली असतानाही अजूनही प्रवासासाठी रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. या लोकांना नवी मुंबई शहरातील सिटी बसेसनेच प्रवास करावा लागत आहे.
परिणामी तळोजा एमआयडीसीत कामाला येणाऱ्या नागरिकांना नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गाचा फायदा होत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या मेट्रो मार्गाचा विस्तार झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनने सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. असोसिएशनच्या माध्यमातून हा मार्ग विस्तारित करण्यासाठी निवेदन देखील देण्यात आले आहे.
सदर निवेदनानुसार बेलापूर ते पेंढारदरम्यान असलेला हा मेट्रो मार्ग तळोजा एमआयडीसी पर्यंत विस्तारित केला गेला पाहिजे आणि 2 नवीन स्थानके विकसित केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मार्गात अकरा मेट्रो स्थानके असून या मार्गावर स्थानक क्रमांक 12 आणि 13 ही दोन नवीन स्थानके तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सिडकोकडून असोसिएशनच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दाखवण्यात आला आहे. यामुळे भविष्यात नवी मुंबई मधील बेलापूर ते पेंढार हा मेट्रो मार्ग तळोजा एमआयडीसी पर्यंत जाणार असे संकेत मिळत आहेत.