Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचे अतोनात असे हाल होत आहेत. साधा एक-दोन किलोमीटर लांबीचा प्रवास असला तरी देखील नागरिकांना तासंतास ट्राफिक जाममध्ये अडकून राहावे लागते.
दरम्यान, मुंबईकरांना याच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
अशातच, आता मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांना लवकरच एका नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मुंबईला लवकरच आपल्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते विनोद तावडे यांनी मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग 24 जुलै 2024 ला सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईमधील भूमिगत मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा हा 24 जुलैला सुरू होणार आहे.
हा भूमिगत मेट्रो मार्ग 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर 27 स्थानके विकसित होत आहेत. विशेष म्हणजे यातील 26 स्थानके ही भूमिगत आहेत आणि फक्त आणि फक्त एक स्थानक हे जमिनीवर आहे.
या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पुढील आठ महिन्यांनंतर सुरू होणार आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे. शहरातील मेट्रोचे जाळे यामुळे आणखी स्ट्रॉंग होणार आहे. खरे तर या भूमिगत मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी तब्बल 37,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना जलद गतीने आरे ते बीकेसी दरम्यान प्रवास करता येणार आहे. या पहिल्या टप्प्यावर सकाळी साडेसहा वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे.
या मेट्रो मार्गामुळे जवळपास 35 किलोमीटर लांबीचे अंतर अवघ्या 90 मिनिटात पार करता येणार आहे. निश्चितच, हा मुंबई मधील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग येथील प्रवाशांचा प्रवास सुकर बनवणारा ठरणार आहे.