Mumbai Metro Train News : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वे वंदे मेट्रो सुरु करणार आहे. ही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरणार आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास हा खूपच वेगवान झाला आहे. यामुळे या गाडीला संपूर्ण देशभरात पसंती मिळत आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असून आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील आठ मार्गांवर ही गाडी धावत आहे.
यातील सहा गाड्या मुंबईवरून धावत आहेत तर उर्वरित दोन गाड्या नागपूरवरून धावत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर तथा इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. जुलै महिन्यात वंदे मेट्रो ट्रेनची ट्रायल रन सुरू होणार अशी बातमी समोर येत आहे. ही गाडी शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दोन शहरांना जोडण्याचे काम करणार आहे.
ही गाडी तब्बल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहील असा दावा करण्यात आला आहे. वंदे मेट्रो राजधानी मुंबईत देखील चालवण्याची रेल्वेची योजना असल्याची बातमी मागे समोर आली होती. यामुळे वंदे मेट्रो ट्रेन सुरू झाली तर राजधानी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते ठाणे दरम्यान वंदे मेट्रो ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा मागे मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. अशातच आता या Vande Metro Train बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली ते आग्रा यादरम्यान सुद्धा ही गाडी सुरू होणार आहे.
ही गाडी सध्याच्या नवी दिल्ली इंटरसिटी सेवेला कडवी झुंज देणार आहे. नवी दिल्ली-आग्रा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला १६ डबे असतील. असे सांगितले जात आहे की ही गाडी आग्रा आणि लखनौ स्थानकांवरुन धावणार आहे.
सध्याच्या अपडेट्सनुसार, नवी दिल्ली-आग्रा वंदे भारत मेट्रो एक्स्प्रेस जुलैमध्ये रेल्वे विभागात ट्रायल केली जाईल. आग्रा ते नवी दिल्ली हे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. सध्या आग्रा ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी इंटरसिटी ट्रेन कॅन्ट स्टेशनवरून पहाटे 5.50 वाजता सुटते.
अशा परिस्थितीत नवी दिल्ली-आग्रा वंदे भारत मेट्रो एक्स्प्रेस ट्रेनची वेळही सकाळची असू शकते, असे मानले जात आहे. निश्चितच ही गाडी सुरू झाली तर नवी दिल्ली ते आग्रा असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.