Mumbai Mhada News : तुमचेही राजधानी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न आहे का ? मग तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर, मुंबईत घर घेणे म्हणजे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट बनली आहे. घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वधारले असून यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न मागे पडत चालले आहे.
मात्र, अशा या परिस्थितीत म्हाडाच्या घरांचा सर्वसामान्यांना मोठा आधार मिळत आहे. म्हाडा प्राधिकरण सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती करत आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून आतापर्यंत शहरात आणि उपनगरात लाखो घरांची निर्मिती झाली आहे.
दरम्यान, आता म्हाडा प्राधिकरण मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना लवकरच एक मोठी गुड न्यूज देणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, म्हाडा मुंबई मंडळाकडून गोरेगाव मधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास केला जाणार आहे.
याअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर प्राधिकरणाच्या माध्यमातून २,५०० घरे विकसित केली जाणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडा मुंबई मंडळाने आधीच गोरेगाव येथील पहाडी मध्ये 2500 हून अधिक घरे तयार केली आहेत.
आता मंडळाकडून गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर या ठिकाणी 2,500 घरांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे. या नवीन गृहप्रकल्पामुळे हजारो नागरिकांना मोक्याच्या ठिकाणी घर खरेदी करता येणार आहे.
या गृह प्रकल्प अंतर्गत तयार होणारी घरे दोन टप्प्यात बांधली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1,500 घरे विकसित होतील. विशेष म्हणजे यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. खरंतर, या प्रकल्पाचा पुनर्विकास हा विकासकांकडून केला जात होता.
यातून म्हाडाला 2700 घरे मिळणार होती. विकासकाने म्हाडाच्या हिश्याच्या एकूण घरांपैकी 306 घरांचे काम देखील सुरू केले होते. मात्र विकासकांकडून या प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाला. यामुळे हा प्रकल्प वादात सापडला. या प्रकल्पाचे काम रखडले.
मग काय हा प्रकल्प विकासकांकडून काढून घेतला अन म्हाडाकडे सोपवण्यात आला. प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळाने मूळ रहिवाशांच्या साडेसहाशे हून अधिक घरांसह सोडतीमधील घरे पूर्ण करण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले.
आता हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे आता याच प्रकल्पातील आपल्या हिश्श्याच्या 2500 घरे विकसित करण्याचा मोठा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
निश्चितचं, या गृहप्रकल्पामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.