Mumbai Mhada News : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी म्हणून मायानगरी मुंबईची ओळख आहे. या मायानगरीत आपल्यापैकी अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न असेल. मायानगरी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी टुमदार घर असणे कोणाला आवडणार नाही.
मात्र अलीकडे बॉलीवूडनगरी, मायानगरी, स्वप्न नगरी म्हणून ख्यातनाम असलेल्या राजधानीत घर घेणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट बनली आहे. कारण की राजधानीत घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत.
त्यामुळे येथे घर घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. आता मात्र मुंबईत घर घेण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडा मोठी मदत करणार आहे.
कारण की म्हाडा आता मुंबईत मोक्याच्या ठिकाणी एक गृहप्रकल्प विकसित करणार असून यामुळे सर्वसामान्यांना मोक्याच्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा लवकरच दहा हजार घरे तयार करणार असून या घरांची योजना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुठे तयार होणार म्हाडाची परववडणारी घरे
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून अभ्युदय नगर (काळाचौकी), आदर्श नगर (वरळी) आणि वांद्रे कॉलनीच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.
दरम्यान या तिन्ही प्रस्तावावर राज्य शासनाने विचार करत अभ्युदय नगर (काळाचौकी) येथील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला मंजुरी दिली आहे. मात्र उर्वरित दोन प्रस्तावावर अजून राज्य शासनाने सहमती दाखवलेली नाही.
सर्वसामान्यांना मिळणार 2 बीएचके घर
काळाचौकी येथील 33 एकर भूखंडावर उभ्या असलेल्या वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. काळाचौकी येथे सध्या 49 इमारती आहेत. येथे जवळपास 3350 नागरिक वास्तव्याला आहेत.
दरम्यान या वसाहतीचा पुनर्विकास झाल्यानंतर म्हाडाला दहा हजार घरे उपलब्ध होतील अशी आशा आहे. यामुळे मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर घेणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे.
या वसाहतीचा पुनर्विकास झाल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्यांना टू बीएचके फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. यामुळे हजारो लोकांच्या घर खरेदीचे स्वप्न परवडणाऱ्या दरात पूर्ण होऊ शकणार आहे.