Mumbai New Highway : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. मुंबईबाबत बोलायचं झालं तर राजधानी मुंबईत मुंबई महापालिकेकडून कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण केले जात आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच मरीन ड्राईव्ह ते वरळी याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार वर्सोवा ते दहिसर या 18.47 km लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोड प्रकल्पासाठी पाच कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.
याचे काम एकूण सहा टप्प्यात पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे. प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे मुंबईमधील या कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यासाठी 35 हजार 955.07 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान या कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसर हे अंतर जलद गतीने कापता येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
वर्सोवा ते दहिसर असा प्रवास करतांना प्रवाशांचे या कोस्टल रोडमुळे 30 ते 40 मिनिटे वाचणार आहेत. त्यामुळे भविष्यात हा कोस्टल रोड मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक कामाचे हत्यार ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महापालिकेने पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड व एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी आणि वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी वर्सोवा व दहिसरला जोडणाऱ्या या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.
या प्रकल्पाचे काम डिझाईन अँड बिल्ड या तत्त्वावर करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प तयार होईल अशी आशा महापालिकेने यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान या प्रकल्पाचे काम पुढील चार वर्षात पूर्ण होईल असा दावा प्राधिकरणाकडून केला जात आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाचा हा दावा कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.