Mumbai New Railway Station : देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. कमी खर्चात अन कमी कालावधीत प्रवास करता येत असल्याने अनेक जण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. यामुळे रेल्वे प्रवासात मोठी गर्दी असते. गर्दीमुळे प्रवाशांना अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी ठाणे रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्यांसाठी खास राहणार आहे. खरे तर ठाणे हे महाराष्ट्रातील एक सर्वात जुने रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.
या गर्दीमुळे प्रवाशांना प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान प्रवाशांची हीच कसरत दूर करण्यासाठी आता ठाणे व मुलुंड दरम्यान एक नवीन स्थानक विकसित केले जाणार आहे. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या या नवीन स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या कामासाठी 185 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे याच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.
हा मंजूर करण्यात आलेला निधी प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ आणि इतर सुविधांसाठी उपयोगात आणला जाणार आहे. हे स्थानक 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट असून या प्रकल्पासाठी आता भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याने नियोजित वेळेतच या स्थानकाचे काम पूर्ण होणार असे दिसत आहे.
रेल्वेमंत्री यांनी नवी दिल्ली येथील रेल भवनात आयोजित बैठकीत या प्रकल्पासाठी भरीव निधी मंजूर करण्याची घोषणा झाली आहे. या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले आणि सप्टेंबर 2025 पर्यंत या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.
यासाठी जवळपास 264 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुलुंड आणि घोडबंदर परिसरातील प्रवाशांना या स्थानकाचा मोठा फायदा होणार आहे. घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट आणि पोखरण मधील नागरिकांचा लोकल प्रवास या स्थानकामुळे अधिक सोयीचा होणार आहे.
या नवीन ठाणे स्थानकामुळे या परिसरातील रेल्वे वाहतूक आणखी सक्षम होणार आहे. यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण व्हावा अशी इच्छा येथील नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
हे नवीन ठाणे स्थानक 275 मीटर लांब आणि 34 मीटर रुंदीचे राहणार आहे. हे स्थानक जमिनीपासून सुमारे नऊ मीटर उंचीवर विकसित केले जाणार आहे. या स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार खूपच मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.