Mumbai News : जर तुम्हीही मुंबईकर असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूड नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबई वाहतूक कोंडीसाठी विशेष कुख्यात बनली आहे. मुंबईत काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी देखील काही तास खर्च करावे लागतात.
अशा परिस्थितीत, मुंबईमधील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि उपनगरात अशा काही भव्य प्रकल्पांची कामे केली जात आहेत, ज्यामुळे भविष्यात मुंबईची वाहतूक कोंडी समोर नष्ट होईल अशी अशा व्यक्त होत आहे.
अशातच नवी मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ती म्हणजे नवी मुंबईत सिडको प्राधिकरणाकडून एक नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत 7 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग विकसित करण्याचे प्राधिकरणाने ठरवले आहे. विशेष म्हणजे हा 7 किलोमीटर लांबीचा मार्ग बनवण्यासाठी तब्बल 912 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
यामुळे सध्या या मार्गाच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या मार्गाचा रूटमॅप थोडक्यात समजून घेणार आहोत, म्हणजेच हा मार्ग कसा असेल याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत.
कसा असेल हा मार्ग ?
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई मधील अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान नवीन सागरी किनारा मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग सात किलोमीटर लांबीचा राहणार असून या मार्गासाठी नुकतेच टेंडर जारी करण्यात आले होते.
या टेंडरमध्ये जयकुमार कंपनीने बाजी मारली असून या कंपनीला आता या प्रकल्पाचे काम पुढील 30 महिन्यात पूर्ण करायचे आहे. याबाबतचे निर्देश प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
यामुळे या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होईल आणि लवकरात लवकर हा प्रकल्प नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा आहे. खरेतर आधी या प्रकल्पासाठी 681 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. मात्र, या खर्चात आता वाढ झाली आहे.
सुधारित खर्चानुसार हा प्रकल्प तयार करण्यासाठी 912 कोटी 28 लाख रुपये खर्च लागणार आहे. सिडको प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत अटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत नवीन मार्ग तयार होणार आहे.
याची लांबी सात किमी इतकी राहणार आहे. या मध्ये मूळ रस्ता ५.८ किमी लांबीचा राहणार आहे. तसेच याला जोडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी 1.2 किमीची मार्गिका विकसित केली जाणार आहे.