Mumbai News : मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. रस्ते विकासाची अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे मुंबईकरांची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत सक्षम झाली आहे. काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईकरांना एका नवीन प्रकल्पाची भेट मिळाली आहे.
काल 12 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ट्रांस हार्बर लींक प्रकल्प अर्थातच एमटीएचएल प्रकल्पाचे उदघाट्न केले आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद होणार आहे. एवढेच नाही तर काल पंतप्रधान महोदयांनी मुंबईमधील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन देखील केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पूर्व द्रुतगती मार्गावरील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंत बोगदा तयार केला जाणार आहे. हा भूमिगत मार्ग मुंबईमधील नागरिकांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. यामुळे शहरातील 5 मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे.
यामुळे नवी मुंबई, मुंबईची पूर्व उपनगरे आणि मरीन ड्राईव्हला जलद गतीने पोहोचता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम येत्या 48 महिन्यात पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.
यासाठी 6717 कोटी 23 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एल अँड टी ही कंपनी या प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहे.
पंतप्रधानांनी या प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन काल केले असल्याने आता लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि येत्या 48 महिन्यात हा प्रकल्प पूर्णपणे बांधून तयार होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
खरंतर या प्रस्तावित भुयारी मार्गचे काम हाती घेण्यापूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शहरातील पाच महत्त्वाच्या मार्गांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाअंती मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हा भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
हा भुयारी मार्ग ४.४६ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील ऑरेंज गेट येथील सरदार पटेल च्या मार्गावरून मरीन ड्राईव्ह येथील कोस्टल रोडला हा बोगदा किंवा भुयारी मार्ग जोडण्याचे प्रस्तावित आहे.
यामुळे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने हा प्रकल्प खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रकल्प मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून सक्षम बनवेल असा दावा जाणकारांनी केला आहे.