Mumbai News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास मात्र तीन दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थातच 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडणार आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
परिणामी रेल्वे गाड्यांमध्ये होणारी संभाव्य गर्दी पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी 31 डिसेंबरला विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे.
दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपनगरांमधून मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला रात्री बारा विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
यामुळे उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 31st सेलिब्रेट करायला उपनगरांमधून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना या लोकल ट्रेनचा विशेष फायदा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर आठ आणि मध्य रेल्वे मार्गावर चार अशा एकूण 12 विशेष लोकल ट्रेन चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. आता आपण कोणत्या मार्गावर या विशेष गाड्या चालवल्या जातील याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार विशेष लोकल
मीडिया रिपोर्टनुसार, चर्चगेट ते विरार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार धिम्या लोकल चालवल्या जाणार आहेत. म्हणजेच या मार्गावर एकूण आठ लोकल गाड्या धावणार आहेत.
चर्चगेट ते विरार दरम्यान मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी या विशेष लोकलच्या फेऱ्या सुरू होतील आणि 2:30 पर्यंत या सेवा चालू राहणार आहेत.
विरार ते चर्चगेट दरम्यान चालवली जाणारी विशेष लोकलची पहिली गाडी विरार स्थानकातून मध्यरात्री सव्वा बारा वाजता सुटणार आहे आणि ती रात्री तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत सोडली जाणार आहे.
याशिवाय सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी या दरम्यान चार लोकल चालवल्या जाणार आहेत. या गाड्या देखील 31 डिसेंबरला मध्यरात्री धावणार आहेत.