Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईत विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अर्थातच अटल सेतूचे लोकार्पण केले आहे.
शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान तयार झालेला या सागरी सेतू प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास सुसाट झाला आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील पहिला टप्पा नुकताच सुरू झाला आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आता राजधानी मुंबईत आणखी एक विशालकाय पूल तयार होणार आहे. हा पूल मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूड नगरी म्हणून ख्यातनाम असलेल्या राजधानीची वैभवता वाढवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईत 43 किलोमीटर लांबीचा नवीन विशालकाय उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे तब्बल अडीच तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटात होईल अशी आशा आहे. निश्चितच आता तुम्हाला या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल.
चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती. राजधानी मुंबईत आतापर्यंत जेवढे महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाले आहेत तेवढ्या साऱ्या प्रकल्पांमध्ये हा नव्याने प्रस्तावित असलेला प्रकल्प खूपच महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प राहणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाची लवकर सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या अर्ध्या टप्प्याला आधीच राज्य सरकारने मान्यता देखील दिलेली आहे. मुंबईत वर्सोवा ते विरार दरम्यान हा प्रकल्प तयार होणार आहे.
म्हणजेच वर्सोवा ते विरार दरम्यान सागरी किनारा मार्ग कोस्टल रोड विकसित होणार आहे. हे अंतर तब्बल 43 किलोमीटर लांबीचे राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्सोवा ते उत्तन म्हणजेच भाईंदर पर्यंत कोस्टल रोड विकसित केला जाणार आहे.
जेथे मुंबई महापालिकेचा कोस्टल रोड प्रकल्प समाप्त होतो त्या उत्तनमधून पुढे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विरारपर्यंत कोस्टल रोड तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर पर्यंत कोस्टल रोड विकसित होणार आहे.
हा देशातील सर्वाधिक लांबीचा फ्लायओव्हर ठरणार आहे. सध्या वर्सोवा ते विरार हा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. या प्रवासासाठी नागरिकांना जवळपास अडीच ते तीन तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. त्यामुळे हा उड्डाणपूल प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात वर्सोवा ते विरार हा प्रवास फक्त 30 मिनिटात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी 64,000 कोटी रुपयांचा खर्च होणार असून या फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला चार-चार मार्गीका राहणार आहेत म्हणजेच हा एक आठ पदरी उड्डाणपूल राहील. येत्या सहा ते सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची आशा आहे.