Mumbai News : लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.
खरंतर सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व सुरू आहे. गणेशोत्सवामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडत आहेत. विविध गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी अभूतपूर्व अशा देखाव्यांची निर्मिती केली आहे.
हे देखावे पाहण्यासाठी राज्यातील पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान 19 सप्टेंबरला सुरू झालेला गणेशोत्सवाचा पर्व आता 28 सप्टेंबर रोजी अर्थातच उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपणार आहे. उद्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.
गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला पुढल्या वर्षी लवकर या म्हणत उद्या निरोप देणारा आहेत. गणेश विसर्जनासाठी मात्र मुंबईमध्ये रात्रीपर्यंत मोठी गर्दी राहणार आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आणि गणेश भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने हे अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
तो म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर 28 सप्टेंबर रोजी मध्ये रात्रीपासून पहाटेपर्यंत दहा विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या दहा विशेष लोकल गाड्यांचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार दहा विशेष लोकल गाड्या?
मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उद्या 28 सप्टेंबर रोजी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते बेलापूर दरम्यान 10 विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
कसं असेल वेळापत्रक ?
- सीएसएमटी ते कल्याण लोकल रात्री एक वाजून 40 मिनिटांनी सीएसएमटी येथून सुटेल आणि रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी कल्याणला पोहोचणार आहे.
- सीएसएमटी ते कल्याण दुसरी विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि पहाटे ४.५५ वाजता कल्याणला पोहोचणार आहे.
- कल्याण ते सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि रात्री दिड वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.
- सीएसएमटी ते ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री अडीच वाजता सुटेल आणि रात्री साडे तीन वाजता ठाण्याला पोहोचणार आहे.
- ठाणे ते सीएसएमटी पहिली विशेष लोकल ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २ वाजता पोहचणार आहे.
- ठाणे ते सीएसएमटी दुसरी विशेष लोकल ठाणे येथून २ वाजता सुटणार आहे आणि सीएसएमटीला रात्री ३ वाजता पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
सीएसएमटी आणि बेलापूर दरम्यान चालणार 4 विशेष गाड्या
- सीएसएमटी ते बेलापूर पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री दिड वाजता बेलापूरकडे रवाना होणार आहे आणि बेलापूरला रात्री अडीच वाजता वाजता पोहोचणार आहे.
- तसेच सीएसएमटी ते बेलापूर दुसरी विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री पावणे तीन वाजता सुटणार आहे आणि बेलापूरला रात्री साधारणता तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे.
- तसेच परतीच्या प्रवासात बेलापूर ते सीएसएमटी पहिली विशेष लोकल बेलापूरहून रात्री सव्वा वाजता सुटणार आहे आणि सीएसएमटीला रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
- बेलापूर ते सीएसएमटी दुसरी विशेष लोकल बेलापूरहून रात्री 2 वाजता सी एस एम टी कडे रवाना होणार आहे आणि सीएसएमटीला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.