Mumbai News:- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राचे देखील राजधानी असून भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणून मुंबईकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या असलेले हे शहर असल्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण मुंबईत येतो. जर आपण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर प्रचंड प्रमाणात असलेली वाहतूक कोंडीची समस्या मुंबईच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
तुम्हाला काही किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी तासंतास ट्राफिकमध्ये अडकून राहण्याची वेळ मुंबईमध्ये येते व याचा अनुभव तुम्हाला देखील बऱ्याचदा आलेला असेल. याचा अनुषंगाने जर विचार केला तर मुंबईतील वाहतूकोडीची समस्या सुटावी याकरिता अनेक प्रकल्पांचे काम मुंबईमध्ये सुरू असून यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात खूप मोठा दिलासा मिळणार आहे. याच अनुषंगाने जर आपण वाशी ते खारघर या प्रवासाचा विचार केला तर या दोन ठिकाणामधील प्रवासाचा वेळ आता कमी होणार आहे.
कारण आता खारघर या ठिकाणी इंटरनॅशनल कार्पोरेट पार्क उभारला जात असून त्याला थेट जोडण्यासाठी खारघर- तुर्भे टनेल रोडची उभारणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह तीन हजार 166 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
वाशी ते खारघर दरम्यानचा प्रवासाच्या वेळेत होईल बचत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंटरनॅशनल कार्पोरेट पार्कला थेट कनेक्टिव्हिटी मिळावी याकरिता खारघर- तुर्भे टनेल रोडची उभारणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असून या प्रकल्पावर सिडकोच्या माध्यमातून 3166 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा प्रकल्प येणाऱ्या चार वर्षात पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
या टनेल रोड प्रकल्पामुळे आता मुंबईहून पुण्याच्या दिशेने ये जा करणाऱ्या वाहनांच्या वाशी ते खारघर प्रवासाच्या वेळेमध्ये तब्बल पंधरा मिनिटाची बचत होणार आहे. यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या ठिकाणी जी काही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती त्यापासून प्रवाशांना मुक्तता मिळणार आहे. कारण सध्या परिस्थितीत जर पाहिले तर सायन ते पनवेल या महामार्गावर वाशी ते खारघर या दरम्यान कायमच वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या मिटावी याकरिता सिडकोच्या माध्यमातून खारघर-तुर्भे टनेल रोडच्या उभारणीसाठीच्या खर्चात सिडको संचालक मंडळाने नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सायन ते पनवेल या महामार्गावर तुर्भे या ठिकाणहून पारसिक हिलचा डोंगर पोखरला जाणार असून हा रस्ता टनेल व व्हाया डक्टच्या माध्यमातून थेट खारघर येथे उभारले जात असलेल्या इंटरनॅशनल कार्पोरेट पार्कला सोडला जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 5.49 किलोमीटर असून त्याच्या दोन्ही बाजूला चार मार्गीका असणार आहेत. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून त्यावर उभारण्यात येणाऱ्या व्हाया डक्टची लांबी 3.4 किलोमीटर असणार आहे व पारसिक टेकड्यांच्या खालून डोंगर पोखरून 1.8 किलोमीटर लांबीचा बोगदा देखील या मार्गामध्ये उभारला जाणार आहे.
सायन ते पनवेल या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने खारघर तुर्भे टनेल रोड उभारण्याकरिता नगर विकास विभागाच्या माध्यमातून सिडकोची नोडल एजन्सी म्हणून 24 जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडीचा ताण कमी होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.