Mumbai News : गेल्या काही वर्षात मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
विशेष म्हणजे अजूनही रस्ते विकासाची अनेक कामे सुरू आहेत. मुंबई महापालिकेकडून शहरात अनेक नवीन रस्ते आणि उड्डाणपूलांची कामे केली जात आहेत. खरेतर, मुंबई महापालिकेने शहरातील उड्डाणपूल अन भुयारी मार्ग, लिंकरोड दुरुस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शहरातील उड्डाणपूलांची दुरुस्ती करून त्यांच्या मजबुती करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला असून या निर्णयामुळे शहरातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि शहरातील नागरिकांना जलद प्रवास करता येणार अशी अशा व्यक्त होत आहे.
मुंबई शहरातील 12 उड्डाणपूलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत आणि त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार आहे.
त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण शहरातील कोणत्या 12 उड्डाणपूलांचे आणि भुयारी मार्गाची दुरुस्तीची आणि मजबुतीकरणाची कामे मुंबई महापालिकेने हाती घेतली आहेत, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, BMC ने पूर्व उपनगरातील आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांची अन भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यात उड्डाणपुलांसह काही भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या आणि मजबुतीकरणाच्या कामाचा समावेश आहे.
याकामासाठी पालिका 23 कोटी 68 लाख रुपये खर्च करणार आहे. यातील काही कामे पावसाळ्याआधी, तर काही कामे पावसाळ्यानंतर पूर्ण होणार अशी माहिती महापालिकेच्या माध्यमातून समोर येत आहे.
कोणत्या उड्डाणपूलांचे अन भुयारी मार्गाचे मजबुतीकरण होणार ?
- चेंबूरमधील स्वामी नारायण उड्डाणपूलाचे काम केले जाणार आहे.
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा पूर्व द्रुतगती मार्ग (चेंबूर बेल्ट) कनेक्शनचे काम सुद्धा मुंबई महापालिका करणार आहे.
- कुर्ला एलबीएस जंक्शन येथील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचे काम पूर्ण होणार आहे.
- चेंबूर अण्णाभाऊ साठे उड्डाणपूलाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.
- चेंबूर अमर महल जंक्शन फ्लायओव्हरचे काम होणार आहे.
- घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे.
- घाटकोपर GMLR उड्डाणपूलाचे काम सुद्धा हाती घेण्यात आले असे.
- मुलुंड नवघर उड्डाणपूलाचे काम पूर्ण होणार आहे.
- सायन पनवेल महामार्ग आणि महाराष्ट्र नगर भुयारी मार्गाची सुधारणा केली जाणार आहे.
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूलाचे काम केले जात आहे.
- एलटीटी आणि कुर्ला दरम्यान पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला परिसरात डबल डेकर उड्डाणपूलाचे काम पूर्ण होणार आहे.