Mumbai News : तुम्हीही मुंबईकर आहात का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटीबद्ध असल्याचे पाहायला मिळाले आहे. राजधानी मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यातही मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.
दरम्यान मुंबईमधील सध्या युद्धपातळीवर काम सुरू असलेल्या एका बहुचर्चित मेट्रो मार्गासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो 3 प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावर गेल्या महिन्यात एक महत्त्वाची चाचणी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी याचे जवळपास 94.7% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मेट्रो अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली असल्याने आता लवकरच हा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा व्यक्त होत आहे. सध्या जसे काम सुरू आहे तसेच काम पुढे सुरू राहिले तर या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा मे 2024 अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार अशी माहिती समोर आली आहे.
म्हणजेच पावसाळा सुरू होण्याआधीच मुंबईकरांना मोठी भेट मिळणार हे स्पष्ट होत आहेत. जर मेट्रो 3 चा हा पहिला टप्पा पावसाळा आधी सुरू झाला तर मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गात एकूण 26 स्थानके तयार होणार आहेत. यातील 25 स्थानके ही भूमिगत राहणार आहेत आणि एक स्थानक जमिनीवर राहणार आहे. म्हणजेच हा मुंबईमधला भूमिगत मेट्रो मार्ग राहणार आहे. दुसरीकडे पुण्यातही भूमिगत मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुण्यात सध्या स्थितीला सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट याचा विस्तारित टप्पा अर्थात सिविल कोर्ट स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे सध्या काम सुरू असून येत्या काही महिन्यात हा देखील मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अशातच आता मुंबई मधल्या भूमिगत मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे मे महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यात आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ, सहार रोड, विमानतळ टर्मिनल, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी ही महत्त्वाची स्थानकें राहणार आहेत.
यातील आरे हे एकमात्र स्थानक जमिनीवर असेल बाकी सर्व स्थानके जमिनीच्या आत म्हणजेच भूमिगत राहणार आहेत. हा पहिल्या टप्प्यातील मार्ग सुरू झाल्यानंतर यावर सकाळी सहा ते अकरा पर्यंत प्रवासी सेवा पुरवली जाणार आहे.
या कालावधीत दररोज 260 फेऱ्या होतील आणि या मार्गावरून दररोज 17 लाख प्रवासी प्रवास करणार असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच या मार्गामुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे.