Mumbai News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहे. रेल्वेची देखील शेकडो कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक आता आधीच्या तुलनेत निश्चितचं सक्षम पाहायला मिळत आहे.
मात्र असे असले तरी अजूनही शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर झालेली नाही. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे रस्त्यांचे आणि रेल्वेचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. विशेषतः रस्ते मार्ग मजबूत करण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहे.
दरम्यान राजधानी मुंबईमधल्या अशाच एका महत्वाच्या रस्ते प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे मुंबई कोस्टल रोड संदर्भात. खरंतर मुंबई कोस्टल रोड ची धुरा आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान आयुक्त अश्विनी भिडे यांनी याच प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती दिली आहे. भिडे यांनी म्हटल्याप्रमाणे कोस्टल रोड प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच दक्षिणेकडील वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पुढल्या महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
हा पहिला टप्पा 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. संपूर्ण कोस्टल रोड बाबत बोलायचं झालं तर हा संपूर्ण प्रकल्प मे 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
10.58 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक ला जोडण्याचे काम करणार आहे.
सध्या या प्रवासासाठी 40 मिनिटांचा कालावधी लागत आहे मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास 14 मिनिटांच्या कालावधी पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे. हा रोड सुरू झाल्यानंतर जवळपास 30 टक्के इंधन बचत होईल अशी आशा जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.
असे झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा घालता येणार आहे आणि सर्वसामान्यांचे पैसे देखील सेव होणार आहेत.