Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतुन मुक्तता मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. खरंतर मुंबई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील जटिल बनत चालली आहे.
या समस्येतून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेने देखील कंबर कसली आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात वेगवेगळी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान आता या कोस्टल रोड बाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
या प्रकल्प अंतर्गत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत रस्ता तयार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम एकूण तीन टप्प्यात पूर्ण केल्या जात असून पहिल्या टप्प्याचे लोकार्पण या नोव्हेंबर महिन्यातच होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा एकूण तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. यापैकी पहिला टप्पा अर्थातच मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क पर्यंतचा टप्पा नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प 10.58 किलोमीटर लांबीचा असून या संपूर्ण प्रकल्पाचे कामे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हा पहिला टप्पा नियोजित वेळेत म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये पूर्ण होणार अशी माहिती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी सी फेस ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास मात्र दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होणार असा दावा केला आहे. सध्या या प्रवासासाठी पाऊण तासांचा कालावधी लागत आहे मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ पंधरा मिनिटात हा प्रवास पूर्ण होणार आहे. निश्चितच या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार यात शंकाच नाही.