Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानीत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये रस्त्यांच्या प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. रस्त्यांची अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली असून यामुळे मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाल्याची पाहायला मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे अजूनही अनेक महत्वांच्या रस्ते प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहे. असाच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे विरार-अलिबाग कॉरिडोर. दरम्यान याच कॉरिडॉर संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कॉरिडॉर साठी आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून निविदा काढण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या बांधकामासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून 18,225 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यानुसार या प्रकल्पाचे काम एकूण 11 टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा 96.48 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर फक्त आणि फक्त 30 महिन्यात बांधून पूर्ण करावा लागणार आहे.
या प्रकल्पाचे काम 30 महिन्यात पूर्ण करण्याची अट निविदेमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम जलद गतीने होईल अशी आशा आहे.
या महामार्गाची सुरुवात वसई तालुक्यातील नवघर येथून होणार आहे. तसेच याचा शेवट पेण तालुक्यातील बळवली येथे होणार आहे. यामुळे या परिसरातील विकासाला पंख लागणार आहेत.
राजधानी प्रमाणेच मुंबई महानगरक्षेत्राचा देखील या कॉरिडॉरमुळे जलद गतीने विकास होणार आहे. या बहुचर्चित मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार आहे.
दरम्यान 11 टप्प्यात होणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा वसई तालुक्यातील बापने गावापासून ते भिवंडी तालुक्यातील पाये गावापर्यंत राहणार आहे. तसेच या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा म्हणजेच अकरावा टप्पा हा रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावापासून ते उरण तालुक्यातील गोविर्लेपर्यंत प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
दरम्यान यासाठीची निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली असून निविदा सादर करण्याची अंतिम दिनांक एक मार्च 2024 ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही निविदा चार मार्चला उघडली जाणार आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम केव्हा सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.