Mumbai Pod Taxi : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. खरतर, मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वधारत चालली आहे. सध्या स्थितीला मुंबईची लोकसंख्या तीस लाखाहून अधिक झाली आहे. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे.
यामुळे ही वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मेट्रो समवेतच मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल अशा विविध प्रकल्पांची भेट मिळाली आहे.
दरम्यान आता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईकरांना पॉड टॅक्सीची देखील भेट मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मायानगरी मुंबईमधील ट्रॅफिक जामची समस्या बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. ही पॉड टॅक्सी वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी यादरम्यान चालवली जाणार आहे.
हा एकूण 8.80 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार आहे. यावर ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने पॉड टॅक्सी चालवली जाणार आहे. या टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 21 रुपये प्रति किलोमीटर या दराने तिकीट काढावे लागणार आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.
दरम्यान आता या प्रकल्पाला केंद्राचे बळ मिळणार असे चित्र आहे. हा प्रकल्प उभारताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला आर्थिक टंचाई जाणवू नये यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत पुरवली जाणार अशी शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील सरकारने तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या चौदा शहरांचा वाहतुकीचा विकास साधणार अशी घोषणा केली आहे.
यामुळे तीस लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबईला देखील याचा फायदा होणार असे म्हटले जात आहे. यानुसार मुंबईमधील प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाला देखील केंद्राकडून आर्थिक बळ मिळू शकणार आहे.
निश्चितच केंद्र सरकारने जर या प्रकल्पाला आर्थिक मदत दिली तर याचे काम जलद गतीने पूर्ण होणार आहे आणि यामुळे मुंबईमधील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कारगर सिद्ध होणार आहे.