Mumbai Pune Railway News : मुंबई, पुणे आणि कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष महत्त्व दिले जाते.
रेल्वेचा प्रवासा खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी नेहमीच रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते.
दरम्यान पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय कामाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर-सातारा या दरम्यान आजपासून ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
26 मार्च ते 29 मार्च दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक सुरू राहणार आहे. यामुळे काही गाड्या उशिरा धावणार अशी माहिती मध्य रेल्वे कडून मिळालेली आहे. विशेष म्हणजे या ब्लॉकमुळे पुण्याहून धावणाऱ्या काही गाड्या रद्द सुद्धा होणार आहेत.
यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागू शकतो. दरम्यान आता आपण या ब्लॉकमुळे कोणत्या गाड्या उशिराने धावणार अन कोणत्या गाड्या रद्द राहणार हे पाहणार आहोत.
कोणत्या गाड्या होणार रद्द
आज, मंगळवारी रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ पुणे-मिरज ही एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच रेल्वे गाडी क्रमांक ०१४२४ मिरज- पुणे एक्स्प्रेस ही देखील गाडी आज रद्द राहणार आहे. यामुळे मिरज ते पुणे आणि पुणे ते मिरज असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
कोणत्या गाड्या उशिराने धावणार
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस : ही गाडी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून सव्वा आठ वाजता रवाना होते मात्र आज 26 मार्चला आणि 29 मार्च 2024 ला ही गाडी 9:45 वाजता रवाना होणार आहे.
कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस : ही गाडी नियमितपणे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून नऊ वाजून दहा मिनिटांनी रवाना होते. मात्र या ब्लॉकमुळे आज ही गाडी दीड तास उशिरा अर्थातच दहा वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.
कोल्हापूर-पुणे डेमू : ही गाडी नियमित कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून पाच वाजता सुटते. मात्र 27, 28 आणि 29 मार्च रोजी ही गाडी दोन तास उशिरा अर्थातच सात वाजता सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.