Mumbai-Pune Vande Bharat Train : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
12 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली आहे. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश होता. यामुळे मुंबईतल्या वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 6 वर पोहोचली आहे.
सध्या स्थितीला मुंबई मधून मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा या मार्गांवर Vande Bharat Train धावत आहे. राज्यातील नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर सुद्धा ही हायस्पीड ट्रेन चालवली जात आहे.
सध्या पुण्यातून एक हायस्पीड ट्रेन धावते
सध्या स्थितीला सुरू असलेली मुंबई ते सोलापूर ही हायस्पीड ट्रेन पुण्यामार्गे धावत आहे. मात्र थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजून एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
परंतु, आगामी काळात पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. म्हणजेच आगामी काळात पुणे रेल्वे स्थानकावरून देखील ही भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सुद्धा ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहे.मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस पुण्यामार्गेच सुरु होणार अशी देखील माहिती समोर येत आहे.
यामुळे पुणेकरांना आगामी काळात आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरेतर, पुणे ते बडोदा दरम्यान आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 12 मार्च 2024 ला सुरू होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता.
परंतु, 12 मार्चला सुरू झालेल्या दहा वंदे भारत एक्सप्रेस मध्ये या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश नव्हता. त्यामुळे आता पुणे ते बडोदा आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान तसेच पुणे ते सिकंदराबाद दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार हा मोठा सवाल अजूनही कायम आहे.
तथापि 2024 अखेरपर्यंत या मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी आशा आहे. मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन केव्हा धावणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.