Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे मुंबईहून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये नेहमीच मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हिच अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने आता मध्य रेल्वे मार्गावर काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस दरम्यान आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. अतिरिक्त गर्दी असतानाही या गाड्यांमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे.
एलटीटी-बनारस विशेष एक्सप्रेस गाडी
एलटीटी-बनारस विशेष एक्सप्रेस गाडी तीन एप्रिल ते 26 जून दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी दर बुधवारी मुंबई येथून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बारा वाजून 15 मिनिटांनी रवाना होणार आहे.
तसेच बनारस- एलटीटी विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत चालवली जाणार आहे. ही ट्रेन दर गुरुवारी बनारस येथून ८.३० वाजता सुटणार अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, वाराणसी इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर विशेष गाडी चालवली जाणार
याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर यादरम्यान सुद्धा विशेष गाडी चालवली जाणार आहे. एलटीटी-दानापूर विशेष गाडी एक एप्रिल ते 29 जून पर्यंत चालवली जाणार आहे.
मध्य रेल्वे केलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सोमवारी आणि शनिवारी १२.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे. तसेच दानापूर- एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष गाडी २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत चालवली जाणार आहे.
ही ट्रेन मंगळवार आणि रविवारी दानापूर येथून ६. १५ वाजता सुटणार अशी माहिती सेंट्रल रेल्वे कडून मिळालेली आहे. या विशेष गाडीला मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा इत्यादी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.